शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आठ खेळाडूंना शासकीय नोकरी

By admin | Published: November 07, 2016 6:50 AM

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करीत राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

मुंबई : विविध खेळांमध्ये राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करीत राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुणवंत खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार हा प्रस्ताव तयार केला होता. त्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे. खेळाडू आणि शासकीय पदसंदीप यादव (प्रशिक्षक, क्रीडा विभाग), कविता राऊत (आदिवासी विकास विभाग), ओंकार ओतारी (तहसीलदार, महसूल विभाग), अजिंक्य दुधारे (प्रशिक्षक, क्रीडा विभाग), पूजा घाटकर (विक्रीकर निरीक्षक, विक्रीकर विभाग), नितीन मदने (तहसीलदार, महसूल विभाग), किशोरी शिंदे ( नगरविकास विभाग) आणि नीतू इंगोले( क्रीडा विभाग) यांचा शासकीय सेवेत समावेश करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)ललिता बाबरला डावलले?रिओ आॅलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी करणारी साताऱ्याची धावपटू ललिता बाबरचे नाव या यादीत नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे, ललिताला क्लास वन अधिकारीपदी नोकरी देऊ, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आॅलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात तिने अंतिम फेरी गाठून उत्कृष्ठ कामगिरीची नोंद केली आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावच्या ललिताने मोठा संघर्ष करत खडतर प्रवास केला आहे. याबाबत लोकमतने ललिताशी संपर्क साधला असता ती म्हणाली, स्वत: मुख्यमंत्र्यांनी मला शासकीय सेवेबाबत आश्वासन दिले आहे. कदाचित, ही पहिली यादी असून पुढच्या यादीत आपले नाव असेल अशी मला खात्री आहे.