मुंबई : सायन-पनवेल महामार्गालगतची तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जमीन परस्पर विक्री करण्याचा प्रकार घडल्याचे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेत कबूल केले.सायन-पनवेल महामार्गासाठी शासनाने १९६५ साली संपादित केलेल्या तुर्भे येथील २ हेक्टर ८८ आर या जमिनीतील शिल्लक १ हेक्टर ७० आर इतकी जमीन शासनाने मूळ मालकाला परत केल्याचे बनावट कागदपत्रतयार करून, पुण्यातील एका गुंतवणूकदाराला १५ कोटीला जमीन विकण्यात आली. याचा नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. मात्र, सदर जमीन सार्वजनिक बांधकाम खात्याच्याच नावावर असून, त्याचा कब्जाही खात्याकडेच असल्याचे पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी निबंधकाच्या भूमिकेबाबत महसूल खात्याकडून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.
सरकारी जमिनीची परस्पर विक्री - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:51 AM