शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शाही मेजवानीत सरकारी उजेड

By admin | Published: December 14, 2014 12:47 AM

मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील अपक्ष नगरसेवक परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी नुकतीच शाही मेजवानी आयोजित केली होती. या मेजवानीत विद्युत

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची उपस्थिती : हिलटॉपवर रंगला सोहळा नागपूर: मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील अपक्ष नगरसेवक परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी नुकतीच शाही मेजवानी आयोजित केली होती. या मेजवानीत विद्युत झगमगाटासाठी चोरीची वीज वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. एकीकडे वीज बिल भरले नाही तर शेतकऱ्यांची वीज कापणारे महावितरणचे अधिकारी या प्रकरणात मात्र गप्प आहेत. वीजचोरी करणाऱ्या कंत्राटदारावर थातूरमातूर कारवाई करीत २१ हजाराचा दंड आकारून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेजवानीसाठी वीजचोरी केली जात असल्याचे उघडकीस आले असून सध्या हा प्रकार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे. नागपूरच्या गुलाबी थंडीत अपक्ष नगरसेवक व मुख्यमंत्र्यांचे खासमखास परिणय फुके यांनी बुधवारी रात्री हिलटॉप परिसरातील एका शाळेच्या परिसरात सरकारच्या मंत्र्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ मंत्री, पदाधिकारी, सचिवस्तरीय अधिकारी उपस्थित होते. ज्या ठिकाणी ही शाही मेजवानी आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईसाठी चक्क वीज वितरण कंपनीच्या खांबावरून वीज घेण्यात आली होती. वीज प्रवाहित करणाऱ्या तारांवर वायर (आकडे) टाकून विजेची खुलेआम चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार अनेकांच्या नजरेस येत होता. धक्कादायक म्हणजे ज्या वीज वितरण कंपनीच्या विजेची चोरी केली जात होती त्याच वीज वितरण कंपनीचे अनेक अधिकारी या मेजवानीला आले होते. नागपुरचे महापौरसुद्धा रात्री येथे आले. यापैकी कुणाच्याही ही वीजचोरी लक्षात आली नाही. शहरात एखाद्याने वीजचोरी केल्यास वीज वितरण कंपनीचे अधिकारी दंडात्मक कारवाई करतात. घरची वीज कापतात. मात्र मंत्र्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या खाजगी कार्यक्रमात उघडपणे वीजचोरी करूनसुद्धा वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित असतानाही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, आक्षेप नोंदविला नाही. डेकोरेशनवाल्याकडून २१ हजाराची दंडात्मक वसुलीएका खाजगी कार्यक्रमात वीजचोरी होत असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. आम्ही कार्यक्रम स्थळाला भेट दिली. आयोजकांकडे विचारणा केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यास डेकोरेशनवाल्याला कंत्राट दिले होते. आयोजकांकडून डेकोरेशनवाल्यांचा नंबर घेऊन विचारणा केली. वीजचोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी दंड भरण्यास तयार असेल तर त्यावर गुन्हा नोंदवीत नाही. डेकोरेशनचा मालक दंड भरण्यास तयार झाला. त्यानुसार त्याच्याकडून वीज चोरीप्रकरणी २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. - राजेश नाईक, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरणलाखोचा खर्च केला, दोन हजाराची वीज कशाला चोरणार?या संपूर्ण कार्यक्रमाचे कंत्राट एका डेकोरेशन कंत्राटदाराला दिले होते. माझ्या शाळेत १०० केव्हीचे जनरेटर आहे. या जनरेटरच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी वीजपुरवठा होत होता. पार्किंगच्या जागेवर कॉन्ट्रॅक्टरने वीजचोरी केली असेल, मात्र ही बाब त्याने माझ्या लक्षात आणून दिली नाही. वीजचोरीची बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी स्वत: कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात तक्रार केली आहे. मी कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले, मग दोन-चार हजाराची वीज कशाला चोरी करणार? - परिणय फुके, नगरसेवक