ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 18 - सण, उत्सवाच्या काळात प्रत्येक वस्तूच्या किमतीत वाढ होत असून सामान्य नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. यात आता शासकीय दुधाच्या दरवाढीची भर पडली आहे. दुग्धविकास मंडळाने दुधाच्या दरात दोन रुपयाची वाढ केली असून पाकीटबंद शासकीय आरे दूध ३४ रुपये प्रतिलिटर झाले आहे.नागपुरातील शासकीय दुग्धविकास योजना मदर डेअरीला हस्तांतरित झाल्याने शासकीय दूध मिळेल की नाही हा संभ्रम लोकांमध्ये आहे. मात्र दूध वितरणाची व्यवस्था शासकीय डेअरीकडे असून नागपूरकरांना मुबलक प्रमाणात दूध उपलब्ध करण्याची ग्वाही प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांनी दिली. वर्धा, चंद्रपूर आणि उमरेड केंद्रातून दुधाचे संकलन केले जात आहे. या तिन्ही केंद्रावरून दर महिन्याला जवळपास २० ते २५ हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. नागपुरात आरे सरिताच्या ४२ केंद्रावरून हे दूध वितरित केले जाते आहे. या केंद्रावर आणि इतर दुकानांमध्ये अर्धा व एक लीटरचे पिशवीबंद दूध उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शासकीय दूधही महागले
By admin | Published: October 18, 2016 8:48 PM