"राज्याचा कारभार सचिवांकडून नव्हे, लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे", काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 07:40 PM2022-08-06T19:40:53+5:302022-08-06T19:41:44+5:30

Atul Londhe : सचिवांना राज्यकारभार चालवण्याचे अधिकार देण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि सचिवांमार्फत महाराष्ट्र चालणार नाही, तर तो लोकप्रतिनिधींच्या मार्फतच चालला पाहिजे, असे अतुल लोंढे यांनी यावेळी स्पष्ट केले.

"Government of the state should be run by people's representatives, not by secretaries", Congress targets Shinde-Fadnavis government | "राज्याचा कारभार सचिवांकडून नव्हे, लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे", काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

"राज्याचा कारभार सचिवांकडून नव्हे, लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे", काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Next

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन करून ३६ दिवस झाले, तरी मंत्रिमंडळ स्थापन करता येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले आहे. मंत्रिमंडळ विस्तार करता येत नसल्याने राज्याचा कारभार सचिवांमार्फत चालवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे, हा तो चुकीचा असून महाराष्ट्राचा कारभार हा सचिवांकडून नव्हे तर लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सचिवालयाचे नाव मंत्रालय करण्याचे कारणच असे होते की, राज्यकारभार हा लोकाभिमुख असावा. लोकांना आपलं वाटावं हा त्याच्या मागचा उद्देश होता. शासनावर लोकप्रतिनिधींचेच वर्चस्व असले पाहिजे, कारण लोकप्रतिनिधी हे लोकांमधून निवडून येतात, त्यांचे  निर्णय असावेत. परीक्षा देऊन आलेल्या सचिवांचे नाही. परंतु शासन, प्रशासनाची चाकं उलटी फिरवण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केलेले आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला.   

याचबरोबर, बिनखात्याचे उपमुख्यमंत्रीच राज्य चालवत आहेत आणि ते जे म्हणतात, तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे हे शिवसेनेतून बंड करुन मुख्यमंत्री तर झाले पण मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र ते करू शकत नाहीत. भाजपाने शिंदेंचा केसाने गळा कापला का? शिवसेनेला संपवण्याच्या प्रयत्नात अनेक चांगल्या लोकप्रतिनिधींची राजकीय कारकीर्द संपवण्याचा कार्यक्रम सुरु आहे का? अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत, असे अतुल लोंढे म्हणाले. 

याशिवाय, जनतेशी काही देणेघेणे नाही फक्त सत्ता महत्वाची आहे, हा भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे. सचिवांना राज्यकारभार चालवण्याचे अधिकार देण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि सचिवांमार्फत महाराष्ट्र चालणार नाही, तर तो लोकप्रतिनिधींच्या मार्फतच चालला पाहिजे, असे अतुल लोंढे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: "Government of the state should be run by people's representatives, not by secretaries", Congress targets Shinde-Fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.