ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 28 - सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी हिताचे निर्णय व्हावेत यासाठी सामूहिक शक्ती निर्माण करावी, मतभेद विसरून एकत्र यावे, तर शेतक-याला न्याय मिळेल, बळीराजाचे हित जपण्यासाठी जागे राहिले पाहिजे. एकतर शेतमालाला किंमत द्या नाही तर कर्जमाफी द्या, महाराष्ट्राचा अन् देशाचा बळीराजा उद्ध्वस्त झाला तर देश मजबूत होणार नाही, शेतकरी हे राज्य अन् देश चालवत आला आहे, असंही पवार म्हणाले आहेत.महाविद्यालयीन जीवनात महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाच्या नेतृत्वाचे स्वप्न बघितले नाही, मात्र यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श माझ्यासमोर होता. त्यांच्या उद्याच्या महाराष्ट्राची भूमिका मला भावली. महाराष्ट्राने मला भरभरून दिले, मात्र त्यातही नाशिककरांचा मोठा वाटा आहे. देशाच्या संसदेत महाराष्ट्राची संख्या वाढू शकलो नाही, हे मान्य करतो. वास्तवतेचे भान ठेवून राजकीय वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच पाय जमिनीवर ठेवणे पसंत केले. सोन्याच्या साखळ्या अन् अंगठ्या घालणाऱ्या पुढा-यांपासून मी नेहमीच लांब राहतो. मुंबईचे डबेवाले हे जास्त करून नाशिकचे, हे नाशिकचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान माणसं माझी आहेत, त्यांचा मला अभिमान वाटतो.
सरकारने कर्जमाफी द्यावी अथवा शेतमालाला किंमत मिळवून द्यावी- शरद पवार
By admin | Published: May 28, 2017 8:21 PM