शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

कोकणवासीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 6:27 AM

चक्रीवादळग्रस्तांना विशेष बाब म्हणून वाढीव मदत

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित व्यक्तींना सर्व नियम बाजूला ठेवून शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तत्पूर्वी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदुर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसानभरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला दिल्या होत्या, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.चक्रीवादळाने रायगड-रत्नागिरीमध्ये विजेचे खांब कोसळले आहेत, ते उभारण्याचे काम सुरू आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर जिल्ह्यांतील तांत्रिक मनुष्यबळ तिथे नियुक्त केले आहे. येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.यंत्रणेने परिस्थिती चांगली हाताळली - बाळासाहेब थोरातसतर्कता काय असते हे निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने दिसून आल्याचे स्पष्ट करून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, महसूल यंत्रणा, पोलीस व इतर सर्वच यंत्रणांनी निसर्ग चक्रीवादळात चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. आता नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करून शासनाने नुकसानग्रस्तांना दिलासा दिल्याचेही ते म्हणाले.पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनाकोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी पुराने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मदत पुनर्वसन विभाग यासंदर्भातील प्रस्ताव पाठवत असल्याचे ते म्हणाले. कोकणवासीयांना पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण विभाग यांच्या मार्फत पक्की स्लॅबची घरे बांधण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री या वेळी म्हणाले. निसर्ग वादळामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना खावटी कर्जापेक्षा खावटी अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रति रेशनकार्ड ५ लीटर रॉकेल मोफत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय त्यांना रेशन दुकानातून तांदूळ तसेच इतर धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.बदललेल्या निकषामुळेमदतीत दीड ते तीन पट वाढच्पक्क्या-कच्च्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी ९५ हजार १०० रुपयांची नुकसानभरपाई दिली जात होती ती आता १ लाख ५० हजार इतकी वाढविण्यात आली आहे. बहुवार्षिक पिकाच्या नुकसानभरपाईसाठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली होती; आता ती वाढवून ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळेल.च्अंशत: पडझड झालेल्या घरासाठी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जात होती; ती आता १५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. कच्च्या घराच्या अंशत: नुकसानीपोटी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जात होती; ती आता १५ हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे. नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी ६ हजार रुपये दिले जात असत; आता ही रक्कम वाढवून १५ हजार इतकी केली आहे.च्गावात लहान-मोठी दुकाने, टपरीचे व्यवसाय करणारे लोक असतात त्यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीतजास्त १० हजारांपर्यंत मदत देण्यात येईल.  च्ज्यांची घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झाली आहेत त्यांना प्रति कुटुंब कपड्यांसाठी पूर्वी २५०० रुपये तर २५०० रुपये भांडीकुंडी यासाठी दिले जात होते. आता विशेष बाब म्हणून ही मदत वाढविण्यात आली आहे. ती कपडे व भांडी यासाठी प्रति कुटुंब प्रत्येकी ५ हजार अशी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे