शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
3
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
4
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
5
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
6
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स
7
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
8
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
9
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
10
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
11
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
12
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
13
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
14
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
15
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
16
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
18
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
19
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
20
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान

सरकारी अनुदानित वसतिगृहातील मुलांना भरावे लागते अधिकचे शुल्क

By admin | Published: July 12, 2017 1:58 AM

मुंबई विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी हे राज्य अनुदानित वसतिगृहामध्ये राहतात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी हे राज्य अनुदानित वसतिगृहामध्ये राहतात. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च - एप्रिल महिन्यात संपल्या. पण, मुंबई विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे अजूनही निकाल लागला नाही. त्यामुळे विद्यार्थी अजूनही वसतिगृहात राहात आहेत. या विद्यार्थ्यांकडून अधिकचे शुल्क आकारले जात आहे. तरी, या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालावे. विद्यापीठाच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये अशी मागणी स्टुण्डट लॉ कौन्सिलतर्फे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी ५ हजार ८७० रुपये तर, अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४ हजार ८२० रुपये शुल्क आकारले जाते. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत, त्यांनी वसतिगृहात राहण्यासाठी दररोजचे १०० रुपये शुल्क भरावयाचे आहे. मुंबईबाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी अनुदानित वसतिगृहांचा आधार असतो. विद्यार्थी वसतिगृहात राहिल्यास त्यांना महाविद्यालयात लेक्चरला जाणे, अभ्यास करणे सोपे जाते. तरी आता विद्यार्थ्यांना दररोज १०० रुपये शुल्क आकारणे योग्य नसल्याचे मत कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठाचे निकाल वेळेत लागले असते तर विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता आले असते. आता ते शक्य नाही. निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे आवश्यक आहे. सरकारी आदेशानुसार, विद्यार्थ्यांकडून १०० रुपये आकारले जात आहेत. विद्यापीठाच्या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे हेड सुप्रिटेण्डट एस.के. त्रिपाठी यांनी मात्र असा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि आता तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही. ज्या विद्यार्थ्यांनी तृतीय वर्षाची परीक्षा दिली आहे परंतु अशा विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाही त्यांच्याकडे आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या गुणपत्रिका मागवल्या आहेत.