पुणे : कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हे संकट येण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. देशात सध्या कांद्याचे मोठे उत्पादन झाले असून मागणी कमी आहे. त्यामुळे मोठा साठा पडून आहे. सरकारने ३० रुपये किलो दराने २० लाख टन कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, अशी मागणी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.ते म्हणाले, यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन २०३ लाख टन झाले आहे. वर्षाकाठी सुमारे १३० लाख टन कांद्याची मागणी असते. १५ लाख टन निर्यात झाली आहे. सुमारे ३० लाख टन कांदा जास्त आहे. त्यामुळे सरकारने त्यापैकी २० लाख टन कांदा ३० रुपये किलो दरान विकत घ्यावा.कांद्याला चांगला भाव आला होता तेव्हा सरकारने निर्यातीवर बंधने घातली आणि पाकिस्तानमूधन कांदा आयात केला. पण निर्यातीवरील बंधने उठवली नाही. तेव्हा आम्ही यास विरोध केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच काळात नव्या कांद्याचे उत्पादन झाले आणि कांद्याचे भाव वेगाने खाली आले. कांद्याची मागणी असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना सरकारने पैसे दिले तर मग आता देशातील शेतकऱ्यांना सरकारने कांदा विकत घेऊन पैसे द्यावेत, असेही शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ९ मे पासून किसान ऋणमुकत अभियान सुरू करण्यात येणार आहे. तुळजापूर येथून या अभियानास सुरूवात होईल. शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही; तर कर्जमुक्तीसाठी हे अभियान असेल.- खासदार राजू शेट्टी
सरकारने २० लाख टन कांदा खरेदी करावा
By admin | Published: May 08, 2016 2:16 AM