शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

सुधारणा प्रस्तावांच्या मर्यादा शासन जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 6:13 AM

राज्यातील महापालिकांमध्ये २५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रस्तावास स्थायी समितीची पूर्व मान्यता आवश्यक असते

मुंबई : राज्यातील महापालिकांमध्ये २५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रस्तावास स्थायी समितीची पूर्व मान्यता आवश्यक असते. मात्र, शासन वेळोवेळी अधिसूचित करेल अशा रकमेपेक्षा अधिक खर्च असणाऱ्या प्रस्तावासच आता स्थायी समितीची पूर्व मान्यता आवश्यक करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.बदललेल्या परिस्थितीत प्रत्येक महानगरपालिकेसाठी त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार स्वतंत्र मर्यादा असण्यासह वित्तीय मर्यादेत वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील विधेयक विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र कायदा असल्याने त्यास ही सुधारणा लागू असणार नाही.नांदेड गुरुद्वारा व्यवस्थापनावरशासन आता ८ सदस्य नेमू शकणारनांदेड येथील शीख गुरुद्वार व्यवस्थापनाबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून मंडळावर शासनाकडून २ सदस्य नामनिर्देशित करण्याच्या सध्याच्या तरतुदीमध्ये सुधारणा करुन आता मंडळावर आठ सदस्य नामनिर्देशित करण्याचे अधिकार शासनाने स्वत:कडे घेतले आहेत. नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब अधिनियम - १९५६ च्या कलम ६१ नुसार, या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासनास नियम तयार करण्याचे अधिकार आहेत.उद्योगांना शेतजमीन खरेदीसाठी अधिनियमामध्ये सुधारणामुंबई : खºया औद्योगिक प्रयोजनासाठी शेतजमीन खरेदीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी केलेल्या तरतुदींच्या अंमलबजावणीत येणाºया अडचणी दूर करण्यासाठी कुळवहिवाट व शेतजमिनीसंदर्भातील अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. खºया औद्योगिक प्रयोजनासाठी खरेदी केलेल्या वर्ग - २ धारणाधिकाराच्या शेतजमिनींच्या बाबतीत खरेदीदाराने विहित मुदतीत अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना खरेदीची रक्कम, ती कोणत्या स्वरुपात आणि कोणत्या लेखाशीषार्खाली जमा करावी याबाबत कळविणे आवश्यक असते.आजच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयास कालावधीची गणना अर्जानंतरच्या कालावधीत समाविष्ट करता येणार नाही़रामदास कदम मंत्रिमंडळ बैठकीत भडकलेराज्यात प्लॅस्टिकबंदी झाली मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर एकदाही बोलले नाहीत. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी निवेदन करावे, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.प्लॅस्टिकबंदीवरून बचाव करु पाहणाºया भाजपाला कोंडीत पकडण्याची रावतेंची ही खेळी शिवसेनेचेच नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उधळून लावली. त्यामुळे कदम मुख्यमंत्र्यांच्या जवळचे की ठाकरेंच्या याची चर्चा मंत्र्यांमध्ये सुरु झाली. मात्र मी माझा विभाग सांभाळण्यास सक्षम आहे, असे कदम म्हणाले.अक्कलकोटला यात्राकरापोटी अनुदानमुंबई : अक्कलकोट (जि. सोलापूर) तीर्थक्षेत्री येणाºया यात्रेकरुंना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे शक्य व्हावे, यासाठी अक्कलकोट नगरपरिषदेस २०१८-१९ पासून यात्राकर अनुदान लागू करण्यास व त्यापोटी दरवर्षी २ कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यात नगरपरिषदांच्या क्षेत्रात यात्रास्थळे आहेत. तेथे यात्रेकरुंकडून संबंधित नगरपरिषदा यात्राकर वसूल करीत होत्या. त्र्यंबकेश्वर, आळंदी, जेजुरी, पंढरपूर, तुळजापूर व रामटेक या सहा नगरपरिषदांच्या क्षेत्रात १९७७-७८ पासून यात्राकर बंद करुन त्यापोटी त्यांना शासनाकडून यात्राकर अनुदान देण्यात येते. पैठण नगर परिषदेस २००७ पासून अनुदान लागू आहे.मुलीच्या जन्मानंतर मिळणार झाडेमुंबई : मुलगी जन्माला आली तर तिच्या भविष्याची काळजी सरकार अनोख्या पद्धतीने घेणार आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी जन्माची नोंद ग्रामपंचायतीत करायची, सोबतचा अर्ज भरुन तेथेच दिला की त्या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून १० रोपे विनामूल्य दिली जातील. त्यात ५ रोपे सागाची व आंब्याची दोन तर फणस, जांभुळ व चिंचेचे एक रोप दिले जाईल. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजनेला मान्यता देण्यात आली.मंगळवेढा उपसासिंचन योजनेस मान्यतासोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची फेररचना करून प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावास बुधवारी मंजुरी देण्यात आली. मंगळवेढा तालुक्यातील या उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र ११ हजार ८२० हेक्टर आहे. योजनेस दोन टप्प्यात खास बाब म्हणून ५३० कोटी इतक्या खर्चास सप्टेंबर २०१४ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली होती. पर्यावरण मान्यता प्राप्त न झाल्यामुळे प्राधिकरणाने आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रशासकीय मान्यता स्थगित केली व अधिनियमानुसार दिलेली मान्यता पुन:स्थापित होईपर्यंत प्रकल्पावर कोणताही खर्च करु नये, असे निर्देश दिले होते.‘शेतकºयांचा बँकावर रोष, पीककर्ज वेगाने वाटप करा’राज्यात खरीपाच्या पेरण्या सुरूअसून शेतकºयांना पैशांची गरज आहे. मात्र, बºयाच ठिकाणी स्थानिक बँक शाखांकडून असंवेदनशीलता दाखविली जात आहे. त्यामुळे शेतकºयांचा बँकांवर रोष दिसून येत असून तातडीने सर्व बँकांच्या स्थानिक शाखांपर्यंत पीककर्ज वितरणाबाबत योग्य ते संदेश द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँक अधिकाºयांना सुनावले. शेतकºयांना पीककर्ज देणे राष्ट्रीय कर्तव्य आहे, याचे भान ठेऊन काम करा. कर्ज वाटप करताना संवेदनशीलता दाखवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ सभागृहात विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक झाली. गेल्या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये पीककर्ज देण्यासंदर्भात झालेल्या निर्णयाचे पालन सर्वच बँकांनी करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करत पेरणीसाठी तातडीने कर्ज उपलब्ध करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समायोजन करा - शिक्षणमंत्रीन्यायालयाच्या निर्णयानुसार १ हजार १८५ विशेष शिक्षक आणि ७२ परिचर यांना सेवेत समायोजीत करा, अशा सूचना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्या.सरकार कर्ज घेऊन रस्त्यांची कामे करणाररस्ते करण्यासाठी आता सरकार बँकेकडून कर्ज घेणार आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागात १७७ कामांच्या माध्यमातून १० हजार किलोमीटर लांबीचे हायब्रीड अ‍ॅन्युईटी रस्ते तयार केले जाणार आहेत़