ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 9- माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना सत्तेचा दुरुपयोग करून अटक करण्यात आली आहे. भुजबळांना अटक केल्याची परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी युती सरकारला दिला आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यांच्या आरोपाखालीच भुजबळांनी रवानगी सध्या तुरुंगात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील वजनदार नेते भुजबळ यांना केलेली अटक ही सूडबुद्धीनं केलेली कारवाई आहे, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
भुजबळांनी काही चूक केली असल्याची त्याची किंमत त्यांना मोजू द्या, मात्र भुजबळ निर्दोष सिद्ध झाल्यास त्यांची किंमत मोजायला तुम्ही तयार राहा, अशा सल्लावजा इशाराच पवारांनी राज्य सरकारला दिला आहे. भुजबळांचं जेलमध्ये जाण्यानं राष्ट्रवादी पक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं यावेळी शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. भुजबळांचा सध्या दाढी वाढवलेला फोटो वायरल झाल्यानं त्याची खूपच चर्चा झाली होती. सुप्रिया सुळेंनीही त्यांची जेलमध्ये जाऊन भेट घेतली होती.