ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ०३ - सरकार दोन दिवसात नाफेडमार्फत नगरमध्ये कांदा खरेदी करणार आह़े त्यामुळे शेतक-यांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल़. शेतक-यांनी प्रत्येक पिकाचा विमा उतरविला पाहिजे, म्हणजे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास शेतक-यांना भरपाई मिळेल़ शेतक-यांच्या जळालेल्या फळबागांचा अहवाल केंद्र सरकारला देऊ, असे कृषी आणि शेतकरी कल्याण केंद्रीय राज्यमंत्री मोहनभाई कुंदेरिया यांनी सांगितल़े
कुंदेरिया यांच्यासह केंद्रीय उद्योगमंत्री नगर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दुष्काळी दौ:यावर आले आहेत़ शुक्रवारी सकाळी पारनेर तालुक्यातील जवळा येथे त्यांनी जळालेल्या फळबागांची पाहणी केली़ त्यानंतर शेतक:यांशी संवाद साधला़ यावेळी शेतक:यांनी कांद्याला हमी भाव मिळावा, कृषी कर्ज माफ करावे, आदी मागण्या केल्या़