मुंबई: आमदार निधीत १ कोटींची वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर आता अर्थमंत्री अजित पवारांनीआमदारांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. नव्या घोषणेनुसार गाडी खरेदीसाठी प्रत्येक आमदाराला ३० लाख रुपये मिळणार आहेत. गाडीसाठी सरकारनं दिलेली रक्कम (मुद्दल) आमदारांना फेडावी लागेल. तर त्यावरील व्याज सरकार भरेल. अजित पवारांच्या या घोषणेनंतर आमदारांनी व्यक्त केला. पवारांच्या घोषणेचं आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. विरोधकांनी अर्थसंकल्पीय भाषणावर नोंदवलेल्या आक्षेपांना आज अजित पवारांनी विधानसभेत उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी आमदारांच्या वाहनासाठी सरकार मदत करणार असल्याची घोषणा केली. आमदारांना गाडी खरेदी करण्यासाठी सध्या १० लाख रुपये कर्जाऊ मिळतात. ही रक्कम आता ३० रुपये करण्यात आली आहे, असं अजित पवारांनी जाहीर केलं. यानंतर सर्वच आमदारांनी बाक वाजवून पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं. ज्या आमदारांची आर्थिक परिस्थिती चांगली असते, त्यांना १० लाखांमध्ये गाडी घेणं शक्य होतं. मात्र, काही आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी नवीन गाडी घेणं कठीण होत असल्यामुळे हा निधी १० लाखांवरून ३० लाख करण्याचा निर्णय घेतल्याचं ते पुढे म्हणाले. याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात आमदार निधी २ कोटींवरुन ३ कोटी रुपये करण्याची घोषणा केली. यानंतर आता आमदारांना वाहन खरेदी करण्यासाठी मिळणारा निधीदेखील थेट तिपटीनं वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांसाठी पवार यांनी डबल धमाका केला आहे. अजित पवारांच्या या दोन्ही घोषणांनंतर आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं.
अजित पवारांचं आमदारांना मोठ्ठं गिफ्ट; सर्व सदस्यांकडून बाक वाजवून आनंद व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 4:59 PM
आमदारांना वाहन खरेदी करण्यासाठी मिळणार ३० लाख; सरकार व्याज फेडणार
ठळक मुद्देआमदारांना वाहन खरेदी करण्यासाठी मिळणाऱ्या रकमेत तिप्पट वाढवाहन खरेदीसाठी मिळणारी रक्कम १० लाखांवरुन ३० लाखांंवरअजित पवारांच्या घोषणेचं सर्वपक्षीय आमदारांकडून स्वागत