श्यामकुमार पुरे
सिल्लोड, दि. 14 - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतून स्वीकारल्या जाणाऱ्या 1000, 500 च्या नोटा आता या बँकेने स्वीकारु नये असे निर्देश RBI ने दिल्याने शेतकऱ्या मध्ये घबरात पसरली आहे. सर्व स्तरातून या निर्णयाचा निषेध होत आहे.सिल्लोड तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 17 शाखा आहेत. या शाखेत सर्वाधिक शेतकऱ्यांचे खाते आहे. ग्रामीण भागात प्रतेक गावात नैशनल बैंक नाही पण गावा गावात बैंक आहे. यामुळे शेतकरी आपले पैसे या बँकेत जमा करीत होते.या मुळे नेशनल बँकेतील गर्दी पण कमी झाली होती. या बँकेतून पैसे मिळत नसले तरी आपले पैसे सुरक्षित करण्यासाठी शेतकरी या बँकेत पैसे जमा करीत होते. RBI ने घेतलेल्या या निर्णया मुळे... शेतकऱ्यां मध्ये निराशा पसरली आहे. हक्काची बैंक सोडून आता शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकेत हेलपाटे खावे लागणार आहहे.