मेट्रोसाठी सरकार आर्थिक वाटा देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:32 AM2021-02-11T03:32:59+5:302021-02-11T03:33:19+5:30

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेकरिता केलेल्या तरतुदीनंतर राज्य सरकार आपला वाटा नक्कीच देईल, असा स्पष्ट निर्वाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.

government will provide financial assistance for the metro says deputy cm ajit pawar | मेट्रोसाठी सरकार आर्थिक वाटा देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मेट्रोसाठी सरकार आर्थिक वाटा देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Next

नाशिक : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेकरिता केलेल्या तरतुदीनंतर राज्य सरकार आपला वाटा नक्कीच देईल, असा स्पष्ट निर्वाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी तूट आली आहे. मात्र त्यानंतरही मध्यम मार्ग काढून जिल्ह्यांना विकासासाठी निधी दिला आहे. त्यासाठी लोकसंख्या आणि विकास यांचे सूत्र ठरवून निधी वाटप निश्चिती करण्यात आली आहे. त्या अंतर्गतच नंदुरबार जिल्ह्याला १३० कोटी, जळगाव जिल्ह्याला ४०० कोटी, धुळे जिल्ह्याला २१० कोटी तर नाशिक जिल्ह्यासाठी ४७० कोटी रुपयांचा नियोजन निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: government will provide financial assistance for the metro says deputy cm ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.