शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

वारसास्थळे जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील

By admin | Published: February 27, 2017 5:36 AM

टाउन हॉल वास्तूची दुरुस्ती व डागडुजीचे काम पूर्ण झाल्यानंतर, या वास्तूला नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे.

ओंकार करंबेळकर,मुंबई-  प्रसिद्ध एशियाटिक लायब्ररी आणि टाउन हॉल वास्तूची दुरुस्ती व डागडुजीचे काम पूर्ण झाल्यानंतर, या वास्तूला नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या टाउन हॉलचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या वेळेस बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘नव्या पिढीसाठी व तरुणांसाठी आपल्या संस्कृतीचे जतन करून, अशी वारसास्थळे जपण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे.’२६ नोव्हेंबर १८०४ रोजी सर जेम्स मॅकिन्टोश यांनी स्थापन केलेल्या लिटररी सोसायटी आॅफ बॉम्बेची पहिली बैठक मुंबईमध्ये झाली. त्यानंतर, १८२३ साली लंडनमध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी आॅफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंडची स्थापना करण्यात आली आणि १८३० साली बॉम्बे ब्रँच आॅफ रॉयल एशियाटिक सोसायटी या नावाने मुंबईत शाखा सुरू करण्यात आली. १८७३ साली त्यामध्ये बॉम्बे जिआॅग्राफिकल सोसायटी विलिन झाली, तर १८९६मध्ये अँथ्रॉपॉलिजिकल सोसायटी आॅफ बॉम्बेचाही त्यामध्ये समावेश झाला. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर रॉयल एशियाटिक सोसायटीपासून वेगळे होऊन, संस्थेचे नाव एशियाटिक सोसायटी आॅफ बॉम्बेची निर्मिती करण्यात आली आणि २००२ साली संस्थेला सध्याचे एशियाटिक सोसायटी आॅफ मुंबई हे नाव मिळाले.>महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार आफ्रिकेचा शोध लावणारा डेव्हिड लिविंगस्टोनचे येथे व्याख्यान झाले आहे. त्याचप्रमाणे, पहिले ग्रामोफोन रेकॉर्डिंगही या इमारतीत करण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १८५८ साली कंपनीकडून ब्रिटिश राणीने राज्यकारभार हाती घेतल्याचे स्पष्ट करणारा जाहीरनामा याच पायऱ्यांवर वाचला गेला, तसेच पहिली मॅट्रिक्युलेशन परीक्षा येथेच आयोजित करण्यात आली होती. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या अस्थीही येथे ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या वास्तूचे पूर्ण जतन होणे आपल्या इतिहासासाठी आवश्यक आहे.- भरत गोठोस्कर, नागरी वारसास्थळांचे अभ्यासक1833साली या टाउन हॉलच्या भव्य इमारतीची बांधणी करण्यात आली. या इमारतीचा आराखडा कर्नल थॉमस कोपर यांनी तयार केला होता. इमारतीच्या स्थापत्यशैलीवर ग्रीक आणि रोमन स्थापत्याचा मोठा प्रभाव दिसून येतो. दर्शनी भागामधील भव्य स्तंभच सर्वांच्या नजरेस आकर्षित करून घेतात, तसेच या इमारतीचे बांधकाम इंग्लंडमधून आणलेल्या खास दगडामधून करण्यात आले आहे. इमारतीच्या आतल्या भागातही जिने, कपाटे, टेबल, खुर्च्यांसाठी लाकडाचा मोठा वापर करण्यात आला आहे. या इमारतीत असणाऱ्या एशियाटिकमध्ये अत्यंत प्राचीन ग्रंथसंपदा असून, पर्शियन, संस्कृत हस्तलिखितेही येथे जपण्यात आलेली आहेत. संस्थेच्या प्राचीन नाण्यांच्या विभागामध्ये ११,८२९ नाणी असून, त्यात कुमारगुप्त प्रथमने सुरू केलेले सोन्याचे नाणेही आहे. छ. शिवाजी महाराज, अकबर यांच्या काळातील सोन्याच्या मोहोरा व नाणीही येथे सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. डान्टेच्या डिव्हाइन कॉमेडी, जैन तीर्थंकर वासूपुज्य यांच्या जीवनावरील ग्रंथ ‘वासूपुज्य चरित्र’, ‘फिरदौसीचा शाहनामा’, ‘अरण्यक पर्व’ असे प्राचीन ग्रंथ येथे ठेवण्यात आलेले आहेत.>२००९ पासून कामाला सुरुवातटाउन हॉलच्या इमारतीचा जीर्णोद्धार व दुरुस्ती २००९ पासून सुरू करण्यात आली होती. या महिन्यामध्ये सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करून, ती नव्याने मुंबईकरांसाठी सज्ज झाली आहे.>आतापर्यंत आपण चित्रपटात केवळ टाउन हॉलच्या पायऱ्यांपर्यंत चित्रीकरण झालेले पाहिले आहे, पण आता नूतनीकरणानंतर आतील भागही इतका सुंदर झाला आहे की, आतही चित्रीकरण करता येईल. - मुख्यमंत्री