मुंबई/नाशिक : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील मेटल्स अॅण्ड मिनरल्स ट्रेडिंग कॉपोर्रेशनने (एमएमटीसी) पाकिस्तानमधूनकांदा आयातीसाठी निविदा काढल्याचे संतप्त पडसाद शेतकऱ्यांमध्ये उमटल्यानंतर सरकारने या निर्णयावर माघार घेतली आहे. निविदेत बदल करण्यात आला असून पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही देशातून कांदा आयात करता येईल, असे सुधारित निविदेमध्ये म्हटले आहे.
महिनाभरात दिवाळीनंतर खरिपाचा कांदा बाजारात येणार असताना इतर देशांतून आयात करून भाव पाडण्याचाच हा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकºयांबद्दल प्रेम उफाळून आले आहे का, असा सवाल काँग्रेसने केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही हा शेतकरीविरोधी प्रकार असल्याचे म्हटले होते. एमएमटीसीने ६ सप्टेंबरला पाकिस्तान, इजिप्त, चीन, अफगानिस्तान आदी देशांतून २ हजार मेट्रिक टन कांद्याची आयात करण्यासाठी निविदा काढली. २४ सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या होत्या. त्यांची वैधता १० ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.निर्यात मूल्य ८५० डॉलरकांद्याच्या वाढत्या भावाने ग्राहकांमध्ये रोष निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य शून्यावरून ८५० डॉलर प्रति टन केले. यातून कांद्याची निर्यात कमी होईल व देशातील बाजारपेठांमध्ये कांदा उपलब्ध होऊन दरही नियंत्रित राहतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.