शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

न्यायालयाच्या नवनवीन आदेशांमुळे सरकारची कोंडी

By admin | Published: April 09, 2017 12:22 AM

न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. परंतु मागच्या काही दिवसांपासून काही प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या नवनवीन

नागपूर : न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. परंतु मागच्या काही दिवसांपासून काही प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या नवनवीन आदेशांमुळे सरकारची कोंडी होत आहे, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केली.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, वैद्यकीय प्रवेशाबाबत वेगवेगळ्या उच्च न्यायालयांचे वेगवेगळे आदेश येत आहेत. त्यामुळे एक ठोस निर्णय घेणे सरकारला अडचणीचे जाते.वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, कराडचे कुलपती आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, वर्धाचे उपकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नुकताच डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील त्यांचा मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्रमुख अतिथी म्हणून लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, आ. प्रकाश गजभिये, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. गिरीश गांधी, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम, अभिजित वंजारी यांच्यासह डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. वीणा प्रकाशे व डॉ. मिलिंद नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)- डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी लिंगभेदावर कॅनडात जो अ‍ॅक्शन प्लान सादर केला त्यावर आता भारत सरकार कायदा बनवित आहे, ही मोठीच गोष्ट आहे. त्यांनी नागपूरच नाही, तर देशाचा गौरव वाढवला आहे, याकडे लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी लक्ष वेधले.