शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

जीएसटीच्या आडून सरकारवर टीकास्त्र

By admin | Published: May 22, 2017 12:43 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा कारभार उत्तम चालू असल्याच्या ‘परसेप्शन’ला छेद देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रविवारी

अतुल कुलकर्णी  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा कारभार उत्तम चालू असल्याच्या ‘परसेप्शन’ला छेद देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रविवारी तडाखेबाज भाषणातून केले. राज्य सरकारच्या अडीच वर्षाच्या कारभाराची चिरफाड करत त्यांनी जीएसटीसाठीच्या विशेष अधिवेशनाचा राजकीय फायदा उठवला. भाजपामधील काही अस्वस्थ सदस्यांनी पाटील यांच्या भाषणाला जोरदार दाद दिली, तर शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी जोरदार भाषण होत असल्याचे इशारे विरोधी बाकावरील सदस्यांना केल्याने तर सत्ताधारी सदस्य त्रस्त झाले.जयंत पाटील यांनी तब्बल ३ तास भाषण केले. या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते परवा भाजपात आलेल्या रामकृष्ण बोर्डीकर यांच्यासह अनेकांना फटके लगावले. जयंतरावांना भाषणासाठी ‘ओपनिंग’ला पाठविणे, ही विरोधकांची रणनिती होती. ‘जीएसटी’साठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाची संधी साधून सरकारवर हल्लाबोल करायचा, असा डावपेच आखून ही फटकेबाजी केली गेली.विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे सोमवारी सरकारवर तुटून पडणार आहेत. एका दिवशी, एकाच नेत्याने सरकारवर हल्ला चढवायचा, असे ठरवून विरोधक अधिवेशनात या उतरले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वक्तृत्व गुण नसलेल्या विधानसभेतील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कामकाजावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध करत सरकारच्या विरोधात बोलण्याची चालून आलेली संधी सोडायची नाही. असे सांगत तो प्रस्ताव बाजूला ठेवला. मुख्यमंत्र्यांनी राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खाते दिल्यानंतरही त्यांनी ते कसे स्वीकारले, मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रामुळे राज्यात एकही मोठा प्रकल्प सुरु झालेला नाही. मुख्यमंत्री गाळ काढण्याचे कामे पाहात फिरत आहेत. ज्या बोर्डीकर यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केले होते, त्यांना पक्षात प्रवेश कसा दिला? अशा एक ना अनेक विषयावरून पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.हे तर खर्चमंत्री!केंद्राने नियोजन आयोग संपवला व नीती आयोग आणला. राज्याने प्लॅन, नॉनप्लॅन असे दोन्ही बजेट एकच करुन टाकले व नियोजन विभाग संपवला. त्यामुळे अर्थ व नियोजन असे मंत्रीपद सांभाळणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडचे नियोजन खाते संपुष्टात आले. आता जीएसटीमुळे कर लावण्याचे अधिकारही संपल्यामुळे त्यांच्याकडील अर्थ खात्यातही काही अर्थ उरला नाही. त्यामुळे आता ते फक्त खर्च करणारे ‘खर्चमंत्री’ राहिलेत! जयंत पाटलांच्या या कोपरखळीला सत्ताधारी बाकावरूनही दाद मिळाली.श्रेय मनमोहन सिंग यांचेचजीएसटी, कर्जमाफी, आधार कार्ड, स्मार्ट सीटी, लाभार्थ्यांना थेट लाभ देणे, इस्त्रोमध्ये गुंतवणूक अशा सगळ्या योजना तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच काळातील. मोदी सरकार फक्त श्रेय घेण्याचे काम करत आहे, असे सांगत पाटील यांनी कोण-कोणत्या योजना मनमोहनसिंग यांच्या काळात झाल्या त्याची यादीच वाचून दाखवली.