पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने निदर्शने करून निषेध नोंदविला, तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.चिंचवड येथील चापेकर चौकात बुधवारी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निषेध सभेत माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश सदस्या बिंदू तिवारी, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, विद्या नवले, तसेच शिवानी भाट, लता पाटील, कमला तोलनुरे, मावळ युवाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण रूपनर, तानाजी काटे, राजेद्रसिंह वालिया, सज्जी वर्की, चिंतामणी सोंडकर, मयूर जैस्वाल, तारीक रिजवी, क्षितिज गायकवाड, अनिरुद्ध कांबळे, संदीपान झोंबाडे, बाळासाहेब सांळुके उपस्थित होते. (प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटीतून तिसऱ्यांदा डावलल्यामुळे शहरवासीयांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. विविध संस्था-संघटनांनी केंद्र व राज्य शासनाचा निषेध नोंदविला. स्मार्ट सिटीसाठी पात्र असूनही डावलले जात असल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
कॉँग्रेस आघाडीतर्फे शासनाचा निषेध
By admin | Published: September 22, 2016 2:18 AM