शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ज्येष्ठ नागरिक धोरणाला सरकारचा हरताळ

By admin | Published: October 03, 2016 3:04 AM

ज्येष्ठांना सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयी, निवास आणि सुरक्षेविषयी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- ज्येष्ठांना सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयी, निवास आणि सुरक्षेविषयी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता ३० सप्टेंबर २०१३ रोजी राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करण्यात आले. तीन वर्षे उलटूनही या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. ज्येष्ठ नागरिक संघटनांशी चर्चा न करता शासनाने या धोरणामध्ये आक्षेपार्ह बदल केलेले असून ते दूर करून त्वरित अमलात आणावे, अशी मागणी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने केली आहे. भारतातील २८ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनांमध्ये महाराष्ट्र राज्याचा अव्वल क्रमांक असून यामध्ये एकूण ३ हजार ८०० संघटना आहेत आणि २९० महिला संघांचा समावेश आहे.देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १२ कोटी इतकी आहे, ही संख्या प्रतिदिनी वाढत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार २०५० साली ही संख्या ३२ कोटी ५० लक्ष इतकी होणार आहे. महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या १ कोटी १६ लाख इतकी आणि २०५० साली ही संख्या ३.५ कोटीवर पोहोचेल. केंद्र शासनाने १९९९मध्ये राष्ट्रीय वृध्दजन नीती जाहीर केली. त्याच धर्तीवर राज्यांनी ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करावे अशी केंद्र सरकारची सूचना होती. यातून २०१३ साली ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करण्यात आले. त्यानंतर मात्र ज्येष्ठ नागरिक संघटनांना विश्वासात न घेता या धोरणात आक्षेपार्ह बदल केल्याचा आरोप राज्यातील ज्येष्ठ नागरिक संघटनांनी केला. महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात १५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेली आश्वासने कागदावरच असून प्रत्यक्षात अंमलबजावणीला मुहूर्त मिळत नसल्याची टीका महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्येतील वयोमर्यादा ६५ वर्षांवरून ६० वर्षे इतकी करण्यात येईल, निवृत्तिवेतनात १००० रु.पर्यंत वाढ, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समिती महिनाभरात स्थापन करणार, ज्येष्ठांना राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश करणे आदी आश्वासने देऊन १० महिने उलटूनही कार्यवाही न झाल्याने ज्येष्ठ नागरिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.>महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या१ कोटी १६ लाख ज्येष्ठ महिला - ५३ टक्केपुरुष - ४७ टक्केज्येष्ठ नागरिक संघटना ३ हजार ८०० महिला संघटना - २९०>प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठांचे वॉकेथॉनज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत १ आॅक्टोबर रोजी देशभरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथे होणाऱ्या वॉकेथॉनच्या माध्यमातून महत्त्वाच्या मागण्या सोडवून ज्येष्ठांना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली जाणार आहे.>देशाकरिता ज्येष्ठांचे मोठे योगदान असल्याने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दृष्टीने ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, उर्वरित आयुष्य सुरक्षितरीत्या जगता यावे, पेन्शन वाढावी,आरोग्य सुविधा, विमा कवच मिळावे आदी मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून शासकीय पातळीवर उपेक्षा होत आहे. दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांनाही पेन्शनचा लाभ घेता यावा, तसेच पोलिसांकडून हेल्पलाइनची सुविधा पुरविण्यात यावी. - डॉ. एस. पी. किंजवडेकर, ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष>या निष्क्रिय शासनाला कधी जाग येणार आहे? सद्यस्थितीत ७० टक्के ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, कुटुंबाकडून छळ केला जातो. याप्रकरणी शासनाला जागे करण्यासाठी लवकरच राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तालुका स्तरावर आंदोलन छेडले जाणार आहे. प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, ही प्रमुख मागणी असणार आहे.-डी.एन.चापके, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष