अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणातून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे गुणगाण केले. विकास करण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते,केंद्र सरकारने हीच इच्छाशक्ती दाखवत ७० वर्षात जी कामे झाली नाहीत ती कामे केल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केले.डॉ.पंदेकृविच्या दीक्षांत सभागृहात आयोजित समारंभाला कृषीमंत्री दादाजी भूसे यांची प्रमुख उपस्थिती होती. एखाद्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी त्याग,साधना,तपस्या करावी लागते तसेच विकासासाठी इच्छाशक्ती असवी लागते.७० वर्षात लोकांना बँक माहिती नव्हती,त्याचे खातेदेखील उघडलेले नव्हते,पंतप्रधान नरेंद्र मोदी यां एकाच वर्षात देशातील ३३ टक्के लोकांची बँक खाते उघडून त्यांना मुख्यप्रवाहात आणले. लोक उघड्यावर शौचास जायचे,याच सरकारने देशात अल्पावधीतच १० कोटी शौचालये उभारून, खेड्यापाड्यातील विशेषत: महिलांना दिलासा दिला आहे. हे सर्व करण्यासाठी साधनेचीही गरज आहे. साधना,तपस्येच्या बळावरच हे सर्व शक्य असल्याचे त्यांनी अधोेरेखित केले. देशाच नाव जगात उज्वल करायचे असेल तर साधना, तपस्यशिवाय पर्याय नाही. ही क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये असल्याचे नावाचा उल्लेख न करता राज्यपाल यांनी अधोरेखित केले.
कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांकडून केंद्र सरकारचे गुणगान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 4:18 PM