उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची शपथ 'राजशिष्टाचारा'ला धरून नाही; राज्यपालांनीच दाखवल्या दोन चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:30 AM2019-11-29T11:30:20+5:302019-11-29T11:54:32+5:30

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला.

The governor was angry over the names of some leaders even before Uddhav Thackeray's oath | उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची शपथ 'राजशिष्टाचारा'ला धरून नाही; राज्यपालांनीच दाखवल्या दोन चुका

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची शपथ 'राजशिष्टाचारा'ला धरून नाही; राज्यपालांनीच दाखवल्या दोन चुका

Next

मुंबई-  मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला. हा शपथविधी समारंभ अनेकांनी याचि देही याचि डोळा पाहिला. परंतु या शपथ ग्रहण समारंभादरम्यान भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्यापूर्वीच काही नेत्यांची नावं घेतली होती, राज्यपालांच्या मते हे शपथ ग्रहण समारंभाच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. 

तसेच या शपथ ग्रहण समारंभात सरकारी यंत्रणेला सहभागी करून न घेतल्यानंही राज्यपाल नाराज आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथ ग्रहण समारंभादरम्यान मंचावरची व्यवस्था योग्य नव्हती. शपथ ग्रहण समारंभादरम्यान प्रशासनाला मंचावरची व्यवस्था करू दिली नाही. त्यामुळे ही त्यात बऱ्याच त्रुटी होत्या, असंही ते म्हणाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे यासंदर्भात नाराजीही व्यक्त केली आहे. शपथविधीदरम्यान नेत्यांची नावं घेण्यात आल्यानं राज्यपाल नाराज आहेत.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपस्थित जनसागराला साष्टांग दंडवत घालत उद्धव ठाकरे यांनी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. उद्धव असे नतमस्तक होताना लाखोंची गर्दी त्यांच्या या विनम्रभावाने हेलावून गेली. महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे दिग्गज नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ते कृतज्ञतापूर्वक भेटले, तेव्हाही टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, जयंत पाटील आणि छगन भुजबळांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. 
 

Web Title: The governor was angry over the names of some leaders even before Uddhav Thackeray's oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.