नवी मुंबई : गोविंदा रे गोपाळा.. यशोदेच्या तान्हय़ा बाळा.. आला रे आला गोविंदा आला. अशा जल्लोषात गोविंदा पथकांचा सराव सुरू आहे. नवी मुंबईतील मोकळय़ा उद्यान आणि मैदानामध्ये गोविंद पथकांचा जोशात सराव सुरू आहे.
अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गोपाळकाला उत्सवासाठी सर्व गोविंदा पथक सज्ज झाले आहेत. शहरातील गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी उंच उंच मनोरे
रचण्याचा सराव सुरू केला
आहे. शहरात ठिकठिकाणी आयोजकांच्या वतीने विजेत्या
गोविंद पथकांसाठी कोटीच्या कोटी उड्डाणो घेण्यात आली आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथकांत कमालीची चुरस लागली आहे. त्याचे नियोजन एक महिना अगोदरपासून सुरू आहे. सायबर नगरीतील गोविंदा पथक ांनी मागील महिन्यांपासून तयारीला सुरुवात केली आहे.
दिवसभराची दैनंदिन कामे आटोपून सर्व गोविंदा संध्याकाळच्या वेळी सरावाला एकत्रित जमत आहेत. त्यासाठी जवळचे मोकळे मैदान, उद्यान अथवा वसाहतीअंतर्गतच्या निर्जन रस्त्याचा वापर सरावासाठी केला जात आहे.
ऐरोली कोळीवाडा मंडळ, ओम साई गोविंदा पथक, शिवगर्जना गोंविदा पथक, गोठिवली गोविंदा पथक, मी राबाडाकर गोविंदा पथक, एकवीरा गोविंदा पथक, अभिनव मित्र मंडळ, सामाजिक युवा मंच,
दोस्ती ग्रुप, जय भवानी मित्र मंडळ या गोविंदा पथकांची तयारी जोमाने सुरू आहे. शहरातील मानाच्या हंडी फोडण्यासाठी अनेक पथकांनी तयारी चालविली आहे.
4ऐरोली कोळीवाडा मंडळाने जोरदार तयारी चालविली आहे. या मंडळाने शहरातील अनेक मानाच्या दहीहंडय़ा फोडल्या आहेत. कोपरखैरणोतील गोविंद पथकांचा सराव अण्णासाहेब पाटील उद्यानात रात्री 9 ते 11 वाजेर्पयत या पथकाचा सराव सुरू आहे.
45 ते 30 वयोगटातील सुमारे 400 ते 450 गोविंदांचा या पथकात समावेश आहे. गेल्या वर्षी नवी मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी सात ते आठ थर रचून हंडी फोडण्याचा प्रय} केला होता. या वर्षी नऊ ते दहा थरांचा संकल्प केला आहे. त्यानुसार गोविंदा पथक जोरदार सराव करीत आहेत.