मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी उत्सवातील उत्साहच मावळला आहे. गोविंदा पथके आणि दहीहंडी समन्वय समितीने वेगवेगळ््या प्रकारे धडपड करून निर्णयात तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदरी निराशा आल्यानंतर या गोविंदांनी आपल्या मनातील खदखद सोशल मीडियावरून व्यक्त केली आहे. सध्या फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या या पोस्ट्सची बरीच चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाने थरांच्या उंचीवर २० फुटांची मर्यादा घातली, तर १८ वर्षांखालील गोविंदांचा सहभाग उत्सवात नसेल, याविषयी निर्बंध घातले. फेसबुकवर विविध गोविंदा पथकांनी दहीहंडीचे थर लावलेल्या छायाचित्रांवर विविध संदेश देऊन पोस्ट्स व्हायरल होत आहे. यात विशेषत: शहर-उपनगर आणि ठाण्यातील गोविंदा पथकांचा अधिक समावेश आहे. शिवाय, दहीहंडी निर्णयाच्या वादात पाठिंबा दिलेल्या राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या समर्थन करणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियावर चर्चा आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट्सच्या माध्यमातून गोविंदाना एकत्र करीत शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. रविवारी शिवाजी पार्कात गोविंदांनी केलेल्या निषेध रॅलीद्वारे याची प्रचिती आली होती.>कितीही लावा नियम आणि कितीही घाला बंदी, खेळल्याशिवाय राहणार नाही आमची दहीहंडीसरकारने किया है गोविंदा का खेल, कितनी भी हो कडी परीक्षा नही होंगे फेलआपला गोविंदा करून आला परदेश वारी, मग का त्याच्या वर इतकी बंधने सारीकितीही खेचा गोविंदाचे पाय, थर लावल्याशिवाय राहणार नायशिवबाचे मावळे आम्ही सारे, थंड नाही बसणार, ८-९ थरावर पुन्हा जोशात चढणारअगर आज एक होगा गोविंदा, हमारा त्योहार सदा रहेगा जिंदाकागदाला चिटकवायला गम लागतो, गोविंदा खेळायला अंगात दम लागतो
फेसबुक, व्हॉट्सअॅपवर गोविंदांचा रोष
By admin | Published: August 23, 2016 1:52 AM