राजानंद मोरे - पुणेमाहिती तंत्रज्ञानाच्या युगातही आधुनिकतेपासून काहीशा दूर असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) लवकरच तंत्रज्ञानाची संजीवनी मिळणार आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवी भरारी घेण्यासाठी एसटीने तब्बल ४०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. एसटीलाही जीपीएस यंत्रणा बसवून ती पूर्णत: आॅनलाइन करण्याचा प्रस्ताव या आराखड्यात आहे. सध्या एसटी बसच्या दररोज सुमारे २९ हजार ५०० फेऱ्या होतात. लाखो लोक एसटीने प्रवास करतात. प्रवाशांच्या गरजेनुसार काळानुरूप एसटीने अनेक बदल स्वीकारले; पण तंत्रज्ञानात एसटी मागे पडली आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेच्या (सीआयआरटी) सहकार्याने विकास नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यानुसार एसटीचे संपूर्ण संगणकीकरण केले जाणार आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक आगार, मोठी बसस्थानके एकमेकांना जोडली जाणार आहेत. ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे प्रत्येक बसवर वॉच राहणार आहे. अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन, प्रशासकीय व्यवस्थापनातही तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. राज्य शासनाकडून हा आराखडा केंद्र सरकारकडे जाईल. केंद्राकडून यासाठी ५० टक्के अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे. विकास आराखड्यातील पहिला टप्पा २०० कोटी रुपयांचा आहे. - जीवनराव गोरे, अध्यक्ष, राज्य मार्ग परिवहन महामंडळपुढील पाच वर्षे डोळ््यांसमोर ठेवून आराखडा तयार केला आहे. बहुतांश खर्च एसटी महामंडळालाच करावा लागणार आहे. आराखडा मंजूर होण्यास अडचण येणार नाही.- संजय खंदारे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळकाय आहे आराखड्यात?संपूर्ण संगणकीकरण, सर्व आगार व प्रमुख बसस्थानकांचे केंद्रीकरण, प्रवासी माहिती प्रणाली, वाहन शोध यंत्रणा (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम), वाहतूक व्यवस्थापन
‘एसटी’लाही जीपीएस यंत्रणा
By admin | Published: March 08, 2015 1:59 AM