राहुल शिंदे, पुणेमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तब्बल २ लाख ८६ हजार २४० विद्यार्थ्यांनी ग्रेस गुणाचा आधार घेतला आहे. मंडळाने लेखी परीक्षेसाठी एकच एक ग्रेस गुण देण्याची पद्धत ठेवल्यामुळे राज्याचा दहावीचा निकाल फुगत असल्याचे दिसत आहे.मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.४६ टक्के लागला, तर नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ८७.७३ टक्के लागला. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यातच ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ पद्धतीने निकाल जाहीर होत असल्याने ४८ हजार ५८३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले तर ८५ ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७८ हजार ६२७ होती.मात्र, ८०/२० ‘पॅटर्न’मुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना २० गुणांच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षांसाठी पैकीच्या पैकी गुण दिले जातात. त्यामुळे सहा विषयांच्या ४८० गुणांच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ १०० ते ९० गुणांपेक्षा कमी गुणांची गरज असते. तरीही २ लाख ८६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस गुणाच्या आधाराची गरज भासली, असे राज्य मंडळाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २ लाख ११ हजार ६३६ विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत.
ग्रेस मार्कांमुळेच वाढला दहावीचा टक्का
By admin | Published: August 03, 2015 1:19 AM