अंधेरीची पोटनिवडणूक होताच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेना दोन गटांत फुटल्याने शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. यामुळे याचा परिणाम राज्यातील सरकारबरोबरच पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींबरोबरच ग्राम पंचायतींमध्येही तसेच राजकारण पहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिंदे गटाचे वर्चस्व की ठाकरे गटाचे यावर या निवडणुका रंगणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींची ही निवडणूक होणार आहे. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७७५१ ग्रा. पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी 1 हजार 165 ग्रा पंचायतींमध्ये निवडणूक झाली होती.
शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा य़ाचा निकाल अद्याप लागला नसल्याने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल, तलवार या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.