शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

Gram Panchayat Election Result Maharashtra: ग्राम पंचायत निवडणूक: पहिला निकाल आला, मुश्रीफ गटाला जबर धक्का, भाजपाने तीन ग्रा. पं. जिंकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 8:46 AM

Gram Panchayat Result: कोल्हापुर जिल्ह्यात पहिला निकाल हाती आला असून कागल तालुक्यातील हसन मुश्रीफ गटाला पहिला धक्का बसला आहे.

राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली असून, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवार) लागणार आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजपा आणि शिंदे गट आघाडीवर आहे. 

कोल्हापुर जिल्ह्यात पहिला निकाल हाती आला असून कागल तालुक्यातील हसन मुश्रीफ गटाला पहिला धक्का बसला आहे. बामणी ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. घाडगेंच्या राजे गटाने बाजी मारली आहे. बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या  तीनही गावात भाजपचा झेंडा फडकला आहे. कागल तालुक्यात भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. 

आतापर्यंत राज्यातील मतमोजणीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाला २५३ आणि मविआला २२७ ग्राम पंचायतींमध्ये आघाडी मिळाली आहे. यापैकी भाजपा १५०, शिंदे गटाला १०३, ठाकरे गटाला ६५, काँग्रेस ५४, राष्ट्रवादी १०८ आणि इतर १११ अशी आघाडी मिळालेली आहे. हे सुरुवातीचे कल आहेत. 

यामुळे ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी शांततेत पार पडली.सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील. ग्रामपंचायतीची निवडणूक कोणत्याही राजकीय  पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी निकालानंतर सर्वच पक्षांकडून आपला उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला जात असल्याने या दाव्यांत कुठला पक्ष प्रबळ ठरतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफBJPभाजपा