Gram Panchayat Election Result Maharashtra: सर्वाधिक सरपंच कोणाचे? ठाकरे गटाने शिंदे गटाला पछाडले; काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 11:11 IST2022-12-20T11:09:35+5:302022-12-20T11:11:00+5:30
Gram Panchayat Result: गेल्यावेळप्रमाणे यंदाही थेट सरपंच पद निवडण्यात येत आहे. भाजपा आणि शिंदे गट आतापर्यंतच्या निकालात ३६१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर मविआ ३२१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे.

Gram Panchayat Election Result Maharashtra: सर्वाधिक सरपंच कोणाचे? ठाकरे गटाने शिंदे गटाला पछाडले; काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम
७ हजार १३५ ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना, भाजपा आणि शिंदे शिवसेना या पक्षांमध्ये जोरदार चुरस आहे. सत्तांतर झाल्यानंतरची ही स्थानिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळे कोणाचा वरचष्मा असणार यावरून त्या पक्षाची ताकद समजणार आहे.
गेल्यावेळप्रमाणे यंदाही थेट सरपंच पद निवडण्यात येत आहे. भाजपा आणि शिंदे गट आतापर्यंतच्या निकालात ३६१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर मविआ ३२१ ग्राम पंचायतींमध्ये आघाडीवर आहे. तर इतर आघाड्या १५१ जागांवर आघाडीवर आहेत.
यामध्ये २२० ग्राम पंचातीमध्ये भाजपा, १३३ वर शिंदे गट, ९९ वर ठाकरे, १३८ वर राष्ट्रवादी आणि ७९ ग्राम पंचायतींलवर काँग्रेस आघाडीवर आहे. परंतू सरपंच पदांमध्ये भाजपा आघाडीवर असली तरी मिळालेल्या ग्रा. पंचायती आणि जिंकलेली सरपंचपदांच्या आकड्यानुसार काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त आहे.
भाजपाने २६ ग्रा. पंचायतमध्ये सरपंचपद जिंकले आहे. शिंदे गटाने ६, ठाकरे गटाने १२, राष्ट्रवादीने १६ तर काँग्रेसने २३ सरपंच पदांवर विजय मिळविला आहे. हे पाहिल्यास शिंदे गटाला ठाकरे गटाने दुपटीने मागे टाकले आहे.