Gram Panchayat Election Result ग्रामपंचायत निवडणूक निकालः भाजपा-अजितदादा गटात चुरशीचा सामना, ठाकरे गट पडला मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:20 AM2023-11-06T10:20:14+5:302023-11-06T10:21:58+5:30

Gram Panchayat Election Result 2023: नक्षलग्रस्त भाग वगळता अन्य ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू झाली आहे.

gram panchayat election results 2023 tough fight between bjp and ajit pawar group thackeray group falls behind | Gram Panchayat Election Result ग्रामपंचायत निवडणूक निकालः भाजपा-अजितदादा गटात चुरशीचा सामना, ठाकरे गट पडला मागे

Gram Panchayat Election Result ग्रामपंचायत निवडणूक निकालः भाजपा-अजितदादा गटात चुरशीचा सामना, ठाकरे गट पडला मागे

Gram Panchayat Election Result 2023: राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींमधील २ हजार ९५० सदस्यपदे, तसेच १३० सरपंचपदांसाठी रविवारी मतदान पार पडले. काही ग्रामपंचायतींत बिनविरोध निवडणूक झाली असली तरी या निवडणुकीत सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने वर्तविला आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता अन्य ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू झाली आहे. यामध्ये महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने अनेक ठिकाणी बाजी मारली असून, महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसने खाती उघडली आहे. या पक्षांचे समर्थित पॅनल विजयी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुती समर्थित पॅनलचा १९९ ठिकाणी विजय झाला आहे. यामध्ये अजित पवार गट सर्वांत पुढे असून, भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, महाविकास आघाडी समर्थित पॅनलचा ६९ ठिकाणी विजय झाला आहे. कोल्हापूरमध्या चांदेकरवाडी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेली आहे. तर, करवीरमध्ये शिवसेना शिंदे गट समर्थित उमेदवार विजयी झाला आहे. चांदेकरवाडीच्या सरपंचपदी सीमा खोत यांची निवड करण्यात आली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गट आघाडीवर

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, अजित पवार गट समर्थित पॅनलचा सर्वांत जास्त ठिकाणी विजय झाला आहे. अजित पवार गटाकडे ७६ ग्रामपंचायती आल्या असून, भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप समर्थित पॅनल ७४ ठिकाणी विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने ५८ ठिकाणी गुलाल उधळला आहे. महाविकास आघाडीबाबत बोलायचे झाल्यास ठाकरे गटाकडे २७, काँग्रेसकडे २७ आणि शरद पवार गटाकडे २६ ग्रामपंचायती आल्या आहेत. 

- कराडमधील येणपे ग्रामपंचायतीवर काँग्रेसने झेंडा फडकवला 

- पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये ४० वर्षानंतर सत्तांतर. अभिजीत पाटील गटाचे दिपक शिंदे विजयी.

- सोलापूरमधील दोड्डी ग्रामपंचायत काँग्रेसकडे, दोड्डी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का

- राधानरगरीमधील चांदेकरवाडी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सीमा खोत यांची चांदेकरवाडीच्या सरपंचपदी निवड.


 

Web Title: gram panchayat election results 2023 tough fight between bjp and ajit pawar group thackeray group falls behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.