संतोष येलकर , अकोलायेत्या ४ आॅगस्टला राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. तथापि, राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने, तहसीलदारांकडून या निवडणुकांचा खर्च उधारीवर भागविला जात आहे.कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा विभागात २३ जिल्ह्यांतील ७ हजार १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि १ हजार २१२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी प्रति मतदान केंद्र १० हजार रुपये किंवा प्रति ग्रामपंचायत ४० हजार रुपयेप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने शासनाकडे करण्यात आली, परंतु हा खर्च भागविण्यासाठी आतापर्यंत प्रति ग्रामपंचायत १५ हजार रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे. मागणीच्या तुलनेत निधी कमी उपलब्ध असल्याने मंडप, वाहनांसाठी डिझेल, प्रिटिंग, स्टेशनरी, पाणी, अल्पोपहार, कर्मचाऱ्यांचे मानधन इत्यादी खर्च संबंधित तहसीलदारांकडून उधारीवर भागविण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च उधारीवर !
By admin | Published: July 20, 2015 1:02 AM