शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेतकऱ्यांना वेळेत भेटण्यासाठी कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीत कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 2:16 AM

ग्रामपंचायत इमारतीत जागा : ; महाराष्ट्रातील ११ हजार ५९९ जणांना लाभ

नितीन काळेल सातारा : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती आणणाºया कृषी सहायकांना आता कामकाजासाठी ग्रामपंचायतीतच किमान १५० ते २०० चौरस फूट जागा कार्यालयासाठी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यालयातूनच त्यांचे कामकाज चालणार असल्याने शेतकºयांनाही वेळेत ते उपलब्ध होतील. तसेच कृषी विभागाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ११ हजार ५९९ कृषी सहायकांना कामकाजासाठी हक्काची जागा मिळणार आहे.

राज्यातील कृषी विभागात साडेअकरा हजारांहून अधिक कृषी सहायक क्षेत्रीय पातळीवर काम करत आहेत. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजना शेतकºयांपर्यंत पोहोचविणे व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. तसेच कृषी विभागातील विविध नैसर्गिक आपत्तींचे सर्वेक्षण करणाºया समितीचे कृषी सहायक हे सदस्य आहेत. शेतकºयांच्या सहली आयोजित करणे, शेतकरी मेळावा घेणे, पीक उत्पन्नांच्या दृष्टीने शेतकºयांना मार्गदर्शन करणे अशी कामेही त्यांना करावी लागतात. तरीही अशा कृषी सहायकांना गावपातळीवर कार्यालय नव्हते. त्यामुळे कामकाज करताना अडचणी निर्माण व्हायच्या.

शेतकरी सल्ला घेण्यासाठी, अडचणी मांडण्यासाठी आल्यास कृषी सहायक कोठे सापडतील, याचा नेम नसायचा. यासाठी आता शासनानेचे कृषी सहायकांना ग्रामस्तरांवर कार्यालयीन कामकाजासाठी जागा आणि फर्निचर उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाºयांना केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कृषी आयुक्तालयांच्या अधिपत्याखालील कृषी सहायकांना ग्रामपंचायत कार्यालयात किमान १५० ते २०० चौरस फूट जागा कार्यालयीन कागदपत्रे व कामकाजासाठी तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. तसेच ही जागा उपलब्ध झाल्यानंतर खुर्ची, टेबल, कपाट आदींची व्यवस्था कृषी आयुक्तालयाने करावी, असे स्पष्ट केले आहे. तर कृषी सहायकांना जागा मिळाली का ? याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांवर देण्यात आली आहे.

यापुढे ग्रामपंचायतीतच कृषी सहायकांना कार्यालयासाठी जागा मिळणार असल्याने त्यांची उपलब्धता नेहमीच गावात राहणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकºयांना अधिक प्रमाणात होईल. तसेच शेतकºयांचे प्रश्न, अडचणी त्वरित सुटण्यास मदत होणार आहे.शासनाच्या या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील सहायकांनाही कार्यालय मिळणार आहे.कार्यालयाबाहेर माहिती...कार्यालय झाल्यानंतर तेथे कृषी सहायकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, कामाचा दिवस आणि वेळ नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना कृषी सहायक वेळेत भेटतील. त्याचबरोबर बाहेर कोठे गेले असतील तर शेतकºयांना मोाबईलवरून माहिती घेता येणार आहे. परिणामी शेतकºयांचे हेलपाटेही टळतील. सातारा जिल्ह्यात कृषी सहायकांची ४४० पदे मंजूर असली तरी ४०४ जण कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या १४९६ आहे. या ठिकाणी कृषी सहायकांसाठी कार्यालय तयार करावे लागणार आहे. तर या सहायकांकडे पाच ते सहा गावांचा कार्यभार असतो.यापूर्वी कृषी सहायकांना कार्यालय नव्हते; पण आता त्यांना ग्रामपंचायत इमारतीत कार्यालयासाठी जागा मिळणार आहे. त्यामुळे सहायकांना शेतकºयांचे प्रश्न, अडचणी सोडविणे सोपे होईल. तसेच कृषी सहायक कधी आणि कोणत्या वेळी गावात उपलब्ध होतील, हेही शेतकºयांना समजणार आहे. - विजयकुमार राऊत, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत