शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

पीककर्जासाठी ग्रामीण बँकेच्या मुख्यालयास टाळे

By admin | Published: June 02, 2016 2:35 AM

पीककर्जाच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्यालयासमोर तीन दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी अखेर या बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले

औरंगाबाद : पीककर्जाच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्यालयासमोर तीन दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी अखेर या बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले. बँक अधिकाऱ्यांनी पीक कर्जाचे थांबलेले वाटप लगेचच सुरू करण्याचे आश्वासन दिल्यावर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखांमधून शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप बंद झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बँकेकडून कर्ज मिळत नसल्यामुळे मराठवाड्यातील शेकडो गावांतील हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी सोमवारपासून बँकेच्या औरंगाबादेतील मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले; परंतु बुधवारी सकाळपर्यंतही बँकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (भाकपा) राज्य कार्यकारिणी सदस्य राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले.महाराष्ट्र ग्रामीण बँक ही बँक आॅफ महाराष्ट्रशी संलग्न आहे. त्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक देशपांडे आणि सहकार खात्याचे सहनिबंधक राजेश सुरवसे तासाभरात घटनास्थळी दाखल झाले. देशपांडे यांनी पीककर्ज वाटपासाठी ग्रामीण बँकेला पाचशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)