वाशिम : मालेगाव पंचायत समितीमधील विस्तार अधिकार्यांच्या जाचामुळे एका ग्रामसेवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १0 मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मालेगाव पंचायत समितीअंतर्गत येणार्या मैराळ डोह येथे संजय शेळके ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. शेळके यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. विस्तार अधिकारी कैलास घुगे आणि यादव पळसकर यांच्यासह आणखी काही अधिकार्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले. मालेगाव रोडवरील पाटील ढाब्याजवळील एका शेतामध्ये शेळके यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे आढळून आले. मृत शेळके यांचा भाऊ बबन शेळके याने वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलीसांनी भादंविचे कलम ३0६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अधिका-याच्या जाचामुळे ग्रामसेवकाची आत्महत्या
By admin | Published: March 11, 2016 2:58 AM