ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 05 - देशभर ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या ५४ व्या राष्ट्रीय जहाज दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दोन दिवसांच्या भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्धाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव श्री. सुमीत मल्लिक (भा.प्र.से) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जहाज महासंचालिका सौ. मालिनी शंकर (भा.प्र.से), राष्ट्रीय जहाज दिन उत्सवाचे अध्यक्ष कॅप्टन बी. बी. सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रदर्शनात जहाजांचा इतिहास, ऐतिहासिक जहाजांच्या प्रतिकृती, खलाशांची ऐतिहासिक साहित्य अशा अनेक दुर्मिळ वस्तूंचे भव्य प्रदर्शन आज नागरिकांसाठी खुले झाले. ५ एप्रिल पर्यंत सायंकाळी ७ वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणाऱ्या या प्रदर्शनात सिंधू, मुघल, मराठा, ब्रिटिश, वाडिया, सिंदिया सारख्या अनेक कालखंडातील जहाजांचा इतिहास प्रदर्शित केला आहे.