शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

आजोबांमुळे आले शिक्षण धोक्यात

By admin | Published: April 15, 2016 2:09 AM

गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरूड या गावी राहणाऱ्या ९० वर्षांच्या चुलत आजोबांनी दिलेल्या जबानीमुळे नवी मुंबईत खारघर येथील वायएमटी दंतवैद्यकीय महाविद्यालयात

मुंबई : गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरूड या गावी राहणाऱ्या ९० वर्षांच्या चुलत आजोबांनी दिलेल्या जबानीमुळे नवी मुंबईत खारघर येथील वायएमटी दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या १९ वर्षांच्या नातीचे शिक्षण धोक्यात आले आहे.चेंबूर येथील बीपीसीएल स्टाफ क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या नेहाश्री ज्ञानेश्वर सोनकुसरे या विद्यार्थिनीने, आपण ‘हलबा’ या अनुसूचित जमातीचे असल्याचा दाखला मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून घेतला होता. हा दाखला चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजच्या प्राचार्यांमार्फत पडताळणीसाठी जात पडताळणी समितीकडे पाठविला गेला. नेहाश्री ‘हलबा’ नव्हे, तर कोष्टी या जातीची आहे, असा निष्कर्ष काढून समितीने तिचा जातीचा दाखला अवैध ठरवून जप्त केला. नेहाश्री ‘हलबा’ जातीची नसूनही तिने फसवणुकीने तसा दाखला घेतला व त्याआधारे प्रवेश घेऊन खऱ्या अनुसूचित जातीच्या एका विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित केले, असे मतप्रदर्शनही समितीने केले होते.समितीच्या या निर्णयाविरुद्ध नेहाश्री हिने उच्च न्यायालयात केलेली रिट याचिका न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने फेटाळली. नेहाश्रीने आपल्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ स्वत:च्या वडिलांचा व दोन चुलत भावंडांचेही ‘हलबा’ जातीचे दाखले सादर केले होते, परंतु हे दाखले अनुसूचित जाती निर्धारित करणाऱ्या राष्ट्रपतींच्या आदेशानंतरचे आहेत. त्यामुळे नेहाश्रीच्या आजोबांनी दिलेल्या माहितीच्या तुलनेत या दाखल्यांचे पुरावामूल्य कमी आहे. परिणामी, नेहाश्री ‘हलबा’ जातीची नाही व तिने त्या जातीचा खोटा दाखला घेतला होता, हा समितीने काढलेला निष्कर्ष चूक नाही, असे न्यायालयाने म्हटले.महाराष्ट्रात लागू असलेल्या कायद्यानुसार, राखीव प्रवर्गातील व्यक्तीचा जातीचा दाखला पडताळणीत खोटा ठरला, तर त्या दाखल्याच्या आधारे घेतलेले लाभ (जसे शैक्षणिक प्रवेश, नोकरी वगैरे) रद्द करण्याची तरतूद आहे. यामुळे नेहाश्रीचा दंतवैद्यक महाविद्यालयातील प्रवेश धोक्यात येऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)काय सांगितले आजोबांनी?नेहाश्रीच्या दाखल्याच्या पडताळणीचे काम मुंबईतील समितीपुढे झाले. कार्यपद्धतीनुसार दक्षता पथकाकडून चौकशी झाली. नेहाश्री मुंबईतील असली, तरी त्यांचे कुटुंब मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील आहे, असे समोर आले. त्यामुळे मुंबईतील समितीने गडचिरोलीच्या समितीस चौकशीकरण्यास सांगितले. गडचिरोली समितीचे दक्षता पथक सोनकुसरे यांच्या मूळ गावी गेले. तेथे त्यांना नेहाश्रीचे ९० वर्षांचे चुलत आजोबा केवलराम सीताराम सोनकुसरे भेटले. त्यांनी सांगितले की, ‘आमच्या घराण्याकडे कोणतीही वडिलोपार्जित शेतजमीन नाही. आम्ही पिढीजात कोष्टी (विणकर) आहोत.’