पालघर : जिल्ह्यातील मांडवा, एडवण, केळवा, माहिम, शिरगाव, सातपाडी, बोर्डी, घोलवड, चिंचणी, झाई-बोरीगाव, डहाणू, राजोडी, सुरुची बाग किनाºयासाठी ४१ लाख ६ हजार ५० रु पयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.रायगड जिल्ह्यातील मांडवा, अलिबाग, आक्षी, नागाव, मुरुड-एकदरा, मुरु ड जंजिरा, काशिद बीच, श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर, दिवेआगर व किहिम किनाºयावर सुरक्षेसाठी ७८ लाख ६ हजार १००, पालघर जिल्ह्यातील मांडवा, एडवण, केळवा आदी समुद्र किनाºयासाठी ४१ लाख ६ हजार ५० रु पयांचा निधी मंजूर केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षेसाठी तीन लाख ५९ हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किना-यांवर सुरक्षेसाठी ४३ लाख ८५ हजार ९५० रुपये मंजूर केले आहेत. विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर ही माहिती देण्यात आली.
कोकण किनाऱ्यावर पर्यटक सुरक्षेसाठी एक कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 5:38 AM