लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारने केलेली कर्जमाफी पुरेशी नसून, त्यात अनेक त्रुटी आहेत़ २५ टक्के अनुदान जाहीर करून काही शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे़ नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी केली आहे़ याबाबत शेतकऱ्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सोमवारी दुपारी मुंबईत भेट घेवून निवेदन दिले़ यात म्हटले आहे की, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २५ टक्के अनुदान हे तुटपुंजे आहे़ ते ५० टक्के करावे, संप काळात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू करून शेतीपिकांना हमीभाव जाहीर करावा़ शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत़ शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले़ या शिष्टमंडळात अभय चव्हाण, दत्तात्रय धनपटे, अॅड़ अमोल टेके, विलास पेटकर, रवींद्र धोर्डे, पाराजी वरकड, सचिन धोर्डे आदी उपस्थित होते़
‘नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान वाढवा’
By admin | Published: June 27, 2017 2:15 AM