पुणे : लांबलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष पिकाला चांगलाच फटका बसला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीमधे १० हजार ५०० टनांनी घट झाल्याची माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली. एकूण निर्यात सरासरीपेक्षा तीस टक्क्यांनी घटेल असा अंदाज द्राक्ष उत्पादकांकडून वर्तविण्यात येत आहे. उत्पादन घटल्याने चांगल्या प्रतीच्या मालाला भाव मिळत आहे. याबाबत द्राक्ष उत्पादक विलास शिंदे म्हणाले, द्राक्ष हंगामाला जवळपास ४० टक्क्यांपर्यंत फटका बसेल, असे सांगण्यात येत होते. त्या प्रमाणे उत्पादनाला फटका बसला आहे. तसेच, आत्तापर्यंत उष्मा वाढला नसल्याने देशांतर्गत मागणी देखील बेताचीच आहे. आता उष्मा वाढू लागल्याने देशांतर्गत मागणीत वाढ होईल. गेल्यावर्षी याच काळामधे अडीच हजार कंटेनर (१ कंटेनर १५ टन) द्राक्षाची निर्यात झाली होती. यंता ती १८०० कंटेनर पर्यंत खाली आली आहे. नाशिक पट्ट्यामधे १५ लाख टन द्राक्षाचे उत्पादन होते. त्या पैकी १२ ते १५ टक्के मालाची निर्यात होते. राज्यात ३० ते ३५ लाख टन द्राक्ष उत्पादन होते. सरासरी १० टक्के मालाची निर्यात होते. देशांतर्गत खप जास्त होतो. उत्पादन घटल्याने यंदाच्या हंगामाला २५ ते ३५ टक्के फटका बसेल, असा अंदाज असल्याचे शिंदे म्हणाले. --युरोपात शंभर रुपये किलोला भावयुरोपीयन देशामधे काळ्या व लाल द्राक्षाला ८५ ते शंभर रुपये किलोमागे मिळत आहे. तर, पांढºया द्राक्षाला ८० ते ९० रुपये भाव मिळत आहे. रशिया आणि दुबईमधे पांढºया द्राक्षाला ५० ते ६० रुपये भाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामधे गेल्यावर्षीपेक्षा किलोमागे २० ते २५ रुपये अधिक भाव मिळत आहे. देशांतर्गत बाजारात द्राक्षाला किलोमागे ३५ ते ४५ रुपये भाव मिळत असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. --ज्यांची द्राक्षे १५ जून ते सप्टेंबर या कालावधीत तोडणीस आली होती, त्यांना अधिक फटका बसला आहे. आॅक्टोबरमधे छाटणी झालेली द्राक्षे चांगली आहेत. देशांतर्गत बाजारपेठच मोठी आहे. देशांतर्गत बाजारात २५ ते ५० रुपये किलोला भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतवारीनुसार ८० ते १२० रुपये भाव आहे. गेल्यावर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारात द्राक्षाचा प्रतीकिलो ७०ते७५ रुपये भाव होता. - कैलास भोसले, कोषाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागाईतदार संघ
द्राक्ष निर्यात १० हजार टनांनी घटली ; उत्पादनात ३० ते ४० टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:00 PM
राज्यात ३० ते ३५ लाख टन द्राक्ष उत्पादन गेल्यावर्षी याच काळामधे अडीच हजार कंटेनर (१ कंटेनर १५ टन) द्राक्षाची निर्यात
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय बाजारात किलोमागे २०उत्पादन घटल्याने चांगल्या प्रतीच्या मालाला भाव गेल्यावर्षी याच काळामधे अडीच हजार कंटेनर (१ कंटेनर १५ टन) द्राक्षाची निर्यात युरोपीयन देशामधे काळ्या व लाल द्राक्षाला किलोमागे ८५ ते शंभर रुपये