शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

कवठेत कडकडीत बंद

By admin | Published: June 05, 2017 1:05 AM

शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशीही कवठे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककवठे येमाई : शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशीही कवठे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. संप मिटल्याचे जाहीर केल्यानंतर शेतकरी संभ्रमात होता. रविवारी सकाळी पुन्हा कवठे गावातून जाणाऱ्या शिरूर मंचर मार्गावर शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात जमा झाला. त्यात युवकांचा मोठा सहभाग होता. ज्या काही शेतकऱ्यांनी दूध आणले होते त्या शेतकऱ्यांनी पुन्हा दूध रस्त्यावर ओतून दिले. रस्त्याने जाणारी वाहने थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. दुधाचा टँकर अडवून पाच हजार लिटरपेक्षा जास्त दूध रस्त्यावर सोडून दिले. भाज्यांचे शहराकडे जाणारे ट्रक अडविलेओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर बनकर फाटा डिंगोरे, पूर्वेकडे पिंपरी पेंढार आळेफाटा येथेही आंदोलन सुरूच आहे. शहराकडे जाणारे भाजीपाल्याचे ट्रक टेम्पो अडविले जात आहेत. कोणत्याही शेतमालाची नासाडी न करता जेथून माल घेऊन आले तेथे परत माघारी पाठवले.आज सकाळी ओतूर येथील मोनिका चौकात कलिंगडाचे टेम्पो अडविले व ते रस्त्याच्या कडेला थांबून ठेवले. डिंगोरे (ता. जुन्नर) येथेही सकाळी शेतकरी-संपकरी आंदोलकांनी भाजीपाल्याचे ट्रक अडविले. त्यांना शहरात भाजीपाला नेऊ नका, तो जेथून आणला तेथे परत घेऊन जा असे सांगून त्यांना थांबवत. यातील काही ट्रकचालकांनी ऐकले नाही, त्यामुळे नाईलाजास्तव भाजीपाला, कांदा रस्त्यावर ओतण्यास भाग पडले.काढलेला भाजीपाला एसटी गाड्यांमधील प्रवाशांना वाटून देत आहेत. दि. ५ जून रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.नसरापूरला निषेध रॅलीनसरापूर : नसरापूर बाजारपेठेतून बळीराजा शेतकरी संघ व नसरापूर व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी निषेध रॅली काढून शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. या वेळी बळीराजा शेतकरी संघाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख शामसुंदर जायगुडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उदय शिळीमकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा फडतरे, भोर तालुकाध्यक्ष प्रमोद मोहिते, तालुका उपाध्यक्ष गणेश शिळीमकर, संघटक भरत कोंडे, हनुमंत कदम, भरत शेटे, तुकाराम झोरे, संभाजी कोंडे, सुधीर शेडगे, धनंजय शिंदे आदी शेतकरी मोठ्या संख्येने या निषेध रॅलीला उपस्थित होते. मुख्य चौकात शासनाचा निषेध करीत टोमॅटो आदी भाजीपाला रस्त्यावर ओतला होता.