शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

वृद्धेची विवस्त्र करून झाडाझडती

By admin | Published: July 28, 2014 4:16 AM

प्रथम वर्गाच्या डब्यातून चुकून प्रवास केल्याने महिला टीसीने वृद्ध महिलेला विवस्त्र करून झाडाझडती घेतल्याची घटना मीरा रोड स्थानकात घडली

मुंबई : प्रथम वर्गाच्या डब्यातून चुकून प्रवास केल्याने महिला टीसीने वृद्ध महिलेला विवस्त्र करून झाडाझडती घेतल्याची घटना मीरा रोड स्थानकात घडली. २२ जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर उशिराने जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने दोन महिला टीसींना निलंबित केले आहे. ६५ वर्षीय पीडिता या अंधेरीहून जलद लोकलने विरारला येत होत्या. द्वितीय श्रेणीचे तिकीट काढल्यानंतर त्या चुकून प्रथम श्रेणीच्या डब्यात चढल्या. मीरा रोड स्थानकात लोकल आली असता एका टीसी महिलेने त्यांना तिकीट विचारले असता, ते द्वितीय श्रेणीचे होते. त्यामुळे टीसीने त्यांना लोकलमधून उतरवून टीसींच्या एका रूममध्ये नेले आणि त्यांच्याकडे २५० रुपये दंड मागण्यास सुरुवात केली. मात्र आपल्याजवळ एवढे पैसे नसल्याचे सांगताच या महिला टीसीने आणि तिच्या आणखी एका सहकारी टीसीने त्यांना दमदाटी करीत विवस्त्र करून झाडाझडती घेतली. यानंतरही त्यांना एक तास रूममध्ये डांबून ठेवण्यात आले. याविरोधात त्या पीडितेच्या मुलीने ग्रँट रोड स्थानकातील टीसींच्या मुख्य कार्यालयात तक्रार केली, तरीही त्या टीसींविरोधात कारवाई केली जात नव्हती. (प्रतिनिधी)