शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
3
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
5
Gold Silver Price 1 October : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; विकत घेण्यापूर्वी पाहा आज सोनं स्वस्त झालं की महाग?
6
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
7
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
8
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
9
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
10
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
11
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
12
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
13
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
14
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
15
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
16
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
17
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
18
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
19
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
20
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा

ग्रॅच्युईटीची मर्यादा आता २० लाख; राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 7:58 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता असताना राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता असताना राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत निवृत्त व सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे निर्णयही झाले.

उपदानाची (ग्रॅच्युईटी) मर्यादा १४ लाखांवरून वाढवून २० लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारप्रमाणे ही मर्यादा २५ लाख रुपये करावी, अशी मागणी होती. सूत्रानुसार १४ लाखांपर्यंतच ग्रॅच्युईटी आतापर्यंत दिली जायची. आता ती २० लाखांपर्यंत दिली जाईल. या निर्णयाचा फायदा मुख्यत्वे अधिकाऱ्यांना होईल. 

‘त्या’ कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना २ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) १९८४ व सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अनुषांगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एकवेळचा पर्याय देण्यात येईल. अशा कर्मचाऱ्यांची संख्या १०,६९३ आहे.

इतर निर्णयआयुर्वेद, युनानी काॅलेजांतील पदभरतीसाठी निवड समिती मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५ करण्याचा तसेच व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षांऐवजी पाच वर्षे राज्य शासनातर्फे विविध विभागांना कर्ज उभारणीसाठी शासन हमी दिली जाते. त्यावर शुल्काचा दर कमी करणार. सैनिकी शाळांसाठी सुधारित धोरण. येथे सैन्यदलातून निवृत्त अधिकारी कमांडट म्हणजे प्राचार्य राहतील. सातारा सैनिकी शाळेप्रमाणे सीबीएसई अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांकडून प्रतिवर्षी पन्नास हजार रुपये इतके शुल्क मंजुरी देण्यात येईल.

राज्यात विशेष शिक्षकांची पदेसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष शिक्षकांची पदे निर्मित करण्यास मान्यता. सध्या कार्यरत विशेष शिक्षकांचे रिक्त शिक्षकीय पदांवर समायोजन करण्यात येईल. उर्वरित पदांवर भरती प्रकिया राबवणार.प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे ४,८६० पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्तीकरिता राखून ठेवण्यात येतील. समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी एकूण २,५७२ विशेष शिक्षक, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) यासाठी ३५८ शिक्षक, आणि अपंग एकात्मक शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) ५४ पदे अशा एकूण २,९८४ शिक्षकांचे समायोजन करणार.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र