शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
3
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
4
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
5
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
6
IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील
7
Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
8
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!
9
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
10
शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य?
11
IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार, KKR च्या इनिंगमध्ये दोन वेळा घडली अशी घटना
12
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
13
अ‍ॅपलनंतर 'ही' स्मार्टफोन कंपनी बनवणार 'मेड इन इंडिया' डिव्हाइस; देशातील ५वा सर्वात मोठा ब्रँड
14
"दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज’’,हर्षवर्धन सपकाळ .
15
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
16
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
17
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
18
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
19
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
20
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश

कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:29 IST

India's first digital education online portal Mahagyandeep: या उपक्रमात ५ वेगवेगळ्या विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे

India's first digital education online portal Mahagyandeep: डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप’या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे.असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयात ‘महाज्ञानदीप’ पोर्टलचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक, पत्रकार आणि अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार MOOC तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत 'भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक' (IKS - Indian Knowledge System - Generic) हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होईल.

या उपक्रमामध्ये  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील