शहरं
Join us  
Trending Stories
1
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
2
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
3
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
5
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
6
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
7
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
8
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
9
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
10
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
11
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
12
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
13
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
14
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
15
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
16
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
17
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
18
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
19
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
20
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

लग्नमंडपात चक्क रक्तदान

By admin | Published: May 22, 2017 6:42 AM

सनईचे मंगलमय सूर... फुलांनी सजलेला मंडप... पाहुण्यांची सुरू असलेली लगबग... असे वातावरण सहसा एखाद्या लग्नमंडपातच अनुभवायला मिळते. परंतु,

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सनईचे मंगलमय सूर... फुलांनी सजलेला मंडप... पाहुण्यांची सुरू असलेली लगबग... असे वातावरण सहसा एखाद्या लग्नमंडपातच अनुभवायला मिळते. परंतु, त्याच लग्नमंडपात लगीनघाईच्या डामडौलासोबत सामाजिक बांधिलकी जपत स्वत: नवरदेव आणि लग्नासाठी आलेल्या नातेवाइकांनी चक्क रक्तदान करत आगळावेगळा उपक्रम राबवला. प्रत्यक्ष लग्नमंडपात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक पुणेकरांनी रक्तदान केले. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भूगाव येथील सिद्धी लॉन्स येथे अनुराज सोनवणे आणि आरती शेटे यांच्या लग्नसोहळ्यात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी श्रीनाथ भिमाले, राजाभाऊ लायगुडे, राम बांगड, प्रसन्न जगताप, उदय जगताप, डॉ. मधुकर साळुंके, रवींद्रनाथ आबनावे, किशोर चव्हाण, अजय भोसले, संजय बालगुडे आदी उपस्थित होते. नवरदेवाच्या सासऱ्यांसह इतर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मिळून शिबिरात ७०हून अधिक जणांनी रक्तदान केले. अनुराज सोनवणे म्हणाले, सध्या पुण्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून लग्नसोहळ्यास येणाऱ्या नातेवाइकांनी रक्तदान करावे, यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. व्हॉॅट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून रक्ताची चणचण किती आहे, हे आजच्या युवा पिढीपर्यंत अनेकदा पोहोचते. परंतु, ती दूर करण्यासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.