शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

राज्यात गावठीचा महापूर!

By admin | Published: July 16, 2015 5:43 AM

पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्र कोरडाठाक पडला असला तरी, राज्यात गावठी दारूचा महापूर आलेला आहे. गावोगावी हातभट्ट्या लागल्या असून, पोलीस आणि स्थानिक

लोकमत स्टिंग : महानगरांमधून वाहतेय हातभट्टीची गटारगंगा
 
मुंबई - पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्र कोरडाठाक पडला असला तरी, राज्यात गावठी दारूचा महापूर आलेला आहे. गावोगावी हातभट्ट्या लागल्या असून, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला ‘धाब्या’वर बसवून खुलेआम गावठी दारू विकली जात आहे. मुंबई, पुण्यासह मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातून ही गटारगंगा वाहत आहे. मुंबईतील मालवणी दारूकांडानंतर राज्यातील ‘गावठी’चे वास्तव ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी उजेडात आणले आहे. 
मुंबईच्या मालवणी भागातील गुत्त्यांवर मिथेनॉलमिश्रित विषारी दारू पिऊन तब्बल १०४ जण दगावले. या दारूकांडानंतर शासनाने कारवाई करीत उत्पादन शुल्क विभागाचे ४ अधिकारी तसेच मालवणीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ८ कर्चमारी निलंबित केले. शिवाय,आरोपींविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखालील गृहविभागाने राज्यातून गावठीचे उच्चाटन करा, असे सक्त आदेश पोलिसांना दिले. मात्र गृहविभागाचे हे आदेश नागपूर व पुण्यात धाब्यावर बसवून दारूविक्री सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंगमधून उघडकीस आले. 
नागपूर शहरात खुलेआम मोहाची दारू गाळली जात आहे. शहराच्या विविध भागांमध्ये गावठीचे रॅकेट कार्यरत आहे. लोकमत प्रतिनिधीने नागपूर शहरातील नंदनवन परिसरातील दोन ठिकाणांहून गावठी दारू मिळवली. इमामवाड्यातील जाटतरोडी भागातील पानटपऱ्यांवर मोहाच्या गावठी दारूबददल माहिती मिळवली. इधर अच्छी, तेज दारू कहा मिलती है, असे विचारता टपरीचालकाने तीन-चार ठिकाणांची माहिती दिली. ‘दारू चाहीये’, अशी मागणी करताच दारू विक्रेत्याने क्षणात बाटली समोर केली.
 
फडणवीसांचे नागपूर शहर दारूचे नंदनवन
नागपूर शहरात गिट्टीखदान (भिवसनखोरी), एमआयडीसी (ईसासनी, शिवनगाव), अंबाझरी (पांढराबोडी), राजनगर (सदर), जरीपटका (मार्टिननगर, टेका, नारा), पाचपावली (लष्करीबाग, तांडापेठ, लालगंज, मोतीबाग), गणेशपेठ (बाजोरिया, लोधीपुरा), इमामवाडा (रामबाग, जाटतरोडी, इंदिरानगर), धंतोली (तकिया, चुनाभट्टी), अजनी (रामेश्वरी, जोगीनगर, टोली), नंदनवन झोपडपट्टी, हिवरीनगर, भांडेवाडी, सक्करदरा, सोनेगाव आदी भागांत मिळते गावठी दारू.
 
पुणे इथेही नाही उणे!
१) पुण्याचेही चित्र फारसे वेगळे नाही. येथे अनेक ठिकाणी चोरीछुपे गावठीच्या थैल्या तळीरामांच्या हातावर टेकवल्या जातात. गोखलेनगरमधील जनवाडी परिसरात राजरोस गावठी विकत मिळते. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या जनवाडी येथील गल्ली बोळात बेकायदा दारु धंदे बोकाळले आहेत. काही घरात महिला दारु विकत आहेत. ताराबाई उद्यानाजवळच्या गुत्त्यावर पोचलेल्या प्रतिनिधीने रिक्षा एका झाडाच्या पारावजळ उभी केली. 
२) पारावार बसलेल्या एकाने ताबडतोब इशा-यानेच काय हवे विचारले. त्याला माल पाहिजे असे सांगताच ‘किती’ असा त्याचा प्रश्न आला. एक फुगा त्याच्याकडे मागितला. (एक फुगा म्हणजे साधारणपणे अर्धा लिटर दारु) त्याने शेजारच्या किराना मालाच्या दुकाणामधून प्लास्टीक पिशवी विकत घ्यायला सांगितली. त्यानंतर अरुंद बोळात पाण्याच्या बादल्यांसोबत ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या कॅनमध्ये भरुन ठेवलेली हातभट्टीची दारु दिली. 
३) एका फुग्याचे गुत्त्यावाल्याने ३५ रुपये सांगितले होते. त्याला दोन फुग्यांचे १०० रुपये देऊ केले परंतु त्याने जास्तीचे पैसे घेण्यास नकार दिला. पोलिसांच्या समोरच हातभट्टीचा धंदा तेजीत चाललेला होता. या सर्व प्रकारचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. पुण्यातील धनकवडी , हडपसर, कोंढवा वानवडी, वारजे, धायरी, नर्हे, कोथरूड, बाणेर, बालेवाड़ी, पिंपरी चिंचवड, दिघी, भोसरी, एमआयडीसी, विश्रांतवाड़ी, मुंढवा, येरवडा, चंदननगर या भागांमध्ये हातभट्टीचे धंदे आहेत.
 
मुंबईत तूर्तास ‘गावठी’ थंड
मालवणी दारूकांडानंतर आयुक्त राकेश मारिया यांनी गावठीचा गुत्ता आढळल्यास विभागाच्या उपायुक्तांवर कठोर कारवाई केली जाईल, असा दम भरल्याने गावठी दारूला तूर्तास तरी आळा बसला आहे. 
 
औरंगाबादेतील गुत्त्यांवर धाडी
औरंगाबादेतील गावठी दारूच्या ५३ अड्ड्यावंर धाडी टाकून ते उद्धवस्त करण्यात आले. जिल्ह्णातील डोंगराळ भागात विशेषत: सिल्लोड, सोयगाव, कन्नड या तालुक्यात शंभरहून अधिक भटटयांवर गाळलेली दारू औरंगाबाद, जालना जिल्ह्णातील विविध गावांतील विक्रेत्यांपर्यंत पोहचविले जाते.
 
रॅकेटची दाणादाण
गेल्यावर्षीपासूनच हातभट्टी चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली होती. अवैध मद्यनिर्मिती, मद्यसाठा, मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी २००८ गुन्हे दाखल करून त्यात ११४० आरोपींना अटक करण्यात आली होती़ या कारवाई अंतर्गत हातभट्टीची २२ हजार २५४ लिटर दारू जप्त करून दोन लाख ३५ हजार ७६३ लिटर रसायनही नष्ट करण्यात आले़ 
 
१० लाख लिटर रसायन नष्ट : उत्पादन शुल्क विभागाने अशा रसायनापासून तयार झालेली गावठी दारू हस्तगत केलीच. पण राज्यातून सुमारे ९ लाख ७४ हजार लिटर रसायन नष्ट केले.
 
१ लाख लीटर गावठी हस्तगत
उत्पादन शुल्क विभागाने १८ जून ते २ जुलैपर्यंत संपूर्ण राज्यातून १ लाख ६७ हजार लीटर गावठी दारू हस्तगत केली. त्यातील सुमारे ८० गावठी दारू गाळणाऱ्या भट्ट्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये सापडल्या. ठाणे विभागात (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड) सर्वाधिक तर औरंगाबाद विभागात सर्वांत कमी गावठी दारू हस्तगत करण्यात आली. ठाणे विभागात खाड्या आहेत. तिवरांची जंगले आहेत. त्यामुळे येथे मुबलक पाणी, भट्ट्या लावण्यासाठी सुरक्षित जागा असल्याने अधिक दारू आढळते.