शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महामॅरेथॉन हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म -- विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:27 PM

कोल्हापुरातील पोलीस ग्राऊंडवर रविवारी (दि. ६) होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-२’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमात वारणा दूध संघ ‘प्राईड पार्टनर’ म्हणून सहभागी झाला आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरातील पोलीस ग्राऊंडवर रविवारी (दि. ६) होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-२’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमात वारणा दूध संघ ‘प्राईड पार्टनर’ म्हणून सहभागी झाला आहे. प्रत्येकाची प्रकृती आरोग्यदायी व सुदृढ बनली पाहिजे. त्याकरिता ‘लोकमत’ने महामॅरेथॉनच्या रूपाने एक चांगला प्लॅटफॉर्म उभारला आहे. त्यात वारणा दूध संघ दुसºयांदा सहभागी होत आहे; त्याचा मला आनंद आहे, असे मत वारणा समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.

राज्यातील नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, पुणे या शहरांत लोकमत अभिनव उपक्रम म्हणून महामॅरेथॉन राबवीत आहे. त्यात प्रत्येक नागरिकाचे जीवन चांगले व आरोग्यदायी राहायला पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्यदायी जीवन कसे जगावे, याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास कोणाला सवड नाही, हा विचार करीत लोकमत समूहातर्फे महामॅरेथॉनच्या रूपाने चांगला उपक्रम राबविला जात आहे. त्याचा भाग म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातर्फे विविध क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार अशा उपक्रमांतून वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात.

वर्षभरात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील मैदानी स्पर्धा खेळविल्या जातात. गेल्याच वर्षी वारणेत राष्ट्रीय स्तरावरील मुले व मुलींच्या गटाच्या शालेय स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. ‘वारणे’ची बास्केटबॉल स्पर्धा ही क्रीडा क्षेत्रात देशाच्या नकाशावर चमकली आहे. वारणा शिक्षण समूहातील अग्रेसर असलेल्या तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी, कोरे इंग्लिश अकॅडमी, वारणा विद्यालय, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, कोरे इंजिनिअरिंंग कॉलेज, कोरे फॉर्मसी कॉलेज अशा अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षण, क्रीडा, आदी क्षेत्रांत वारणेचे नाव कोरलेले आहे. वारणा दूध संघाच्या वारणा श्रीखंड व दुग्धजन्य पदार्थांच्या गोडीने, तर भारतासह जगभरात ‘वारणे’चे नाव पोहोचविलेले आहे.

विशेष म्हणजे वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातर्फे दरवर्षी सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांची जयंती ते पुण्यतिथी ‘पर्वकाल’ म्हणून साजरी केली जाते. या महिन्याभराच्या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जातात. प्रामुख्याने ‘वारणे’मध्ये दरवर्षी १३ डिसेंबरला तात्यासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त सद्भावना दौड आयोजित केली जाते. यात संपूर्ण वारणा खोºयातील कार्यकर्ते, शेतकरी सभासद उपस्थित राहतात. त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध आयोजित केले जाते. हे मैदान पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, आदी राज्यांतून कुस्तीशौकीन लाखोंच्या संख्येने कुस्त्यांचा आनंद लुटण्यासाठी येत असतात; त्यामुळे ‘वारणे’चे हे कुस्ती मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि जगविख्यात झाले आहे, याचा वारणावासीयांना आनंद आहे.वारणेने नेहमीच प्रत्येकाच्या आरोग्यदायी व सुदृढ जीवनासाठी पावले उचलली आहेत. यापुढेही अशा उपक्रमांसाठी ‘वारणे’चे प्रयत्न सुरूच राहतील. ‘लोकमत’ने रविवारी सकाळी आयोजित केलेल्या महामॅरेथॉनमध्ये मी स्वत: सहभागी होणार आहे; तुम्हीही व्हा, असे आवाहनही डॉ. कोरे यांनी केले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरे