सोलापूर : जिल्ह्यातील एक लाख ९१ हजारांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरले असून, त्यापैकी २,५६६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले.सोलापुरात एक लाख २२ हजार ८३५ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले. राष्टÑीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाºयांकडे दिलेल्या आकडेवारीनुसार अपेक्षित एक लाख ९१ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन फॉर्म भरणे अपेक्षित होते. आॅनलाइन अर्जदारांपैकी २६ शेतकºयांचा जिल्हा, तर दोन शेतकºयांचा राज्यस्तरावर कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला होता. त्यानंतर, जिल्ह्यातील २,५३८ शेतकºयांची पात्र ‘ग्रीन’ यादी आली असून, त्याची तपासणी करून सहकार विभागाने बँकांना दिली आहे.>नाशिकला मिळाले केवळ प्रमाणपत्रनाशिक : दिवाळीपूर्वीच कर्जमाफीचे प्रमाणपत्र भरून फोटोसेशन झालेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीचा पैसा जमा होण्यास मुहूर्त सापडलेला नाही. ३१ आॅक्टोबरला जिल्हा बॅँकेत दीड लाख शेतकºयांपैकी ८७९ शेतकºयांच्या प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे सुमारे ३ कोेटी ७० लाखांचा निधी जमा झाला आहे. मात्र, तालुकास्तरीय समितीच्या अहवालानंतरच प्रत्यक्षात संबंधित शेतकºयांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सोलापुरात ग्रीन यादीची तपासणी अजून सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:29 AM