शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

मैदान दत्तक धोरण; हे पाप युतीचेच!

By admin | Published: January 19, 2016 3:57 AM

मुंबईतील मोकळी मैदाने आणि भूखंड लाटता यावेत यासाठीच सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मैदान दत्तक धोरण आणल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली

मुंबई : मुंबईतील मोकळी मैदाने आणि भूखंड लाटता यावेत यासाठीच सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मैदान दत्तक धोरण आणल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. सभागृहात प्रस्ताव आणायचा आणि बाहेर विरोधी भूमिका घ्यायची, हा तमाशा युतीने बंद करावा, असा टोलाही निरुपम यांनी लगावला. आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, मोकळी मैदाने आणि भूखंडाबाबतच्या धोरणाचा मसुदा जेव्हा प्रथम समोर आला तेव्हाच राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, काँग्रेस नगरसेवक राहुल गांधींच्या दौऱ्यात व्यस्त असताना सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर धोरण मंजूर करून घेतले. सभागृहात प्रस्ताव मांडणाऱ्या पक्षांनी सभागृहाबाहेर मात्र विरोधाचा तमाशा चालविला असून, मुंबईकरांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे निरुपम म्हणाले.स्थानिक नेत्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी या धोरणाला स्थगिती दिल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. अद्याप आयुक्तांकडे याबाबत कोणतेच आदेश आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना विमानतळावर गाठून एका साध्या निवेदनाच्या कागदावर सह्या घेण्यात आल्या, अशी टीका निरुपम यांनी केली. शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांनी केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा पोरखेळ चालविला आहे, अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईतील सर्व मैदाने आणि भूखंड महापालिकेच्याच ताब्यात राहायला हवेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे केवळ स्थगितीची घोषणा करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी हे धोरणच रद्द करावे, अशी मागणीही निरुपम यांनी केली. मुंबईकरांच्या हिताला बाधा आणणारे मैदान धोरण रद्द करावे यासाठी काँग्रेस सर्व पर्याय तपासणार आहे. प्रसंगी पालिकेच्या मैदान धोरणाविरोधात आंदोलन तसेच न्यायालयीन लढाही देऊ, असे निरुपम यांनी स्पष्ट केले.> मुंबई दौऱ्यात राहुल गांधींसाठी सह्याद्री अतिथीगृहात व्यवस्था करण्यात यावी, अशी लेखी मागणी काँग्रेसने केली; शिवाय ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनीही मुख्यमंत्री कार्यालय तसेच अतिथिगृहातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाने अर्जाची पोच देण्याची किमान सभ्यता दाखविली नाही, असा आरोप निरुपम यांनी केला.