शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर केईएममध्ये विलगीकरण कक्ष सुरू

By admin | Published: July 01, 2017 3:15 AM

परळ येथील केईएम रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात विशेषत: स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात विशेषत: स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी के.ई.एम. रुग्णालयास भेट दिली असता विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर या रुग्णालयात अशा प्रकारचा कक्ष सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांकरिता विलगीकरण कक्ष आवश्यक असून, ज्या ठिकाणी असे कक्ष नाहीत तेथे तातडीने सुरू करण्यात यावेत, असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिले.शंभरपेक्षा अधिक ताप, सर्दी-खोकला, घशाची खवखव अशी लक्षणे असतील तर अशा वेळेस डॉक्टरांनी एक दिवसाची वाट बघून रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यास त्याला ‘आॅसेलटॅमीवीर’ गोळी सुरू करावी. विशेष म्हणजे केंद्राच्या पथकाने याला सहमती दर्शविली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. वेगाने फैलावणाऱ्या स्वाइन फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांना भेटी देत आहेत. आतापर्यंत त्यांनी कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाला भेट देऊन टॅमीफ्लू गोळ्यांचा साठा, विलगीकरण कक्षाच्या सुविधा यांचा आढावा घेतला.शुक्रवारी आरोग्यमंत्र्यांनी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील खासगी डॉक्टर व रुग्णालयांची बैठक घ्यावी. खासगी रुग्णालय व डॉक्टरांनी स्वाइन फ्लूच्या आजाराचे लक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणारा फलक लावावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच गरोदर माता अशा गटाकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.